West Bengal Panchayat Election 2023 : देशातील राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या परिणामांचं प्रमाण वाढलं असून, त्यामध्ये नकारात्मकतेचीच किनार जास्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारा हिंसाचार पाहता याचीच प्रचिती येत आहे. प. बंगालमध्ये 73,887 ग्राम पंचायत जागांसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदानाची सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

64,874 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं असून, त्यापैकी  9,013  जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये 8,874 जागा तृणमूलच्या असल्याचं सांगण्यात आलं. पण, एकिकडे मतदानाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे मात्र हिंसा भडकल्याचं पाहायला मिळालं. मागील 24 तासांमध्ये या भागात जवळपास 14 जाणांचा मृत्यू झाला असून, इथं अनेक जिल्ह्यांमध्ये बॉम्ब हल्ले आणि गोळीबार सुरु असल्याचं वृत्त समोर आलं आहे. हिंसेला अतिशय गंभीर वळण मिळालं असून, काही भागांमध्ये मतपेटीची जाळपोळ केल्याच्याही घटना घडल्या असून, काही ठिकाणी मतपेट्या पळवून नेल्याचाही प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. 






पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या या हिंसाचारामध्ये टीएमसी, भजाप आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. इथं सध्या पडलेली ठिणगी आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची दूरवस्था पाहता येथील यंत्रणांवरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे इथं मतदान केंद्रांवर प्रचंड सुरक्षा तैनात असूनही हिंसा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कार्यकर्त्यंमधील मतभेदातून उसळलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी आता पोलीस यंत्रणाही बळाचा वापर करताना दिसत आहेत.


हेसुद्धा वाचा : शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर 


2024 निवडणुकांची पूर्वतयारी.... 


पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या या निवडणुका 2024 निवडणुकांची रंगीत तालिम मानली जात आहे. पण, शनिवारी समोर आलेल्या प्रत्येक दृश्यामुळं इथं भडकलेली हिंसा विचार करायला भाग पाडत आहे. केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांचा फौजफाटा असतानाही मतदानाच्या दिवशी हा असा प्रकार घडणं म्हणजे लोकशाहीवर आलेलं संकटच आहे.