पक्षातील लोकांकडून पत्नीबद्दल `त्या` अश्लील टीकेमुळे अखेर मोठ्या नेत्याचा पक्षाला रामराम
पत्नीवरील टीकेमुळे अस्वस्थ होता हा नेता
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ची तयारी करत असलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना गौतम बुद्ध नगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते अनिल यादव यांनी सर्व पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असलेले अनिल यादव यांनी राजीनामा देत म्हटले की, 'हा समाजवादी पार्टी नाही ज्याचा मी खरा सैनिक आहे.' त्यांची पत्नी पंखुडी पाठकही काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत असल्याने तेही काँग्रेस पक्षात येऊ शकतात अशी चर्चा आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना राजीनामा देताना अनिल यादव यांनी काही समाजवादी नेत्यांनी पत्नी आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी पंखुरी पाठक यांच्याविरोधात अश्लिल भाष्य केल्याचा आरोप केला आहे. ज्यांना पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही, उलट अनिल यादव यांना गप्प राहण्यासाठी दबाव आणला गेला. त्यामुळे अनिल यादव यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटवर एक व्हिडिओही अपलोड केला आहे.
>