नवी दिल्ली : समलैंगिकतेविषयक प्रकरणे गुन्ह्याच्या चौकटीबाहेर ठेवण्यात यावेत यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या चौकटीत ठेवावे किंवा नाही? याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच याप्रकरणी फेरयाचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या याचिकेची सुनावणी घटनापीठासमोर करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधिशांनी स्पष्ट केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरन्यायाधिशांचा समावेश असणाऱ्या खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले होते. या याचिकेनुसार, ३७७ व्या कलमातील कायदेशीर बाबीला आव्हान देण्यात आले आहे. या कलमानुसार, दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांच्या सहमतीने अनैसर्गिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा मानण्यात येईल. तसेच या प्रकरणी १० वर्षांपर्यंत शिक्षा किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 


मात्र, कलम ३७७ हे संविधानविरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.