नवी दिल्ली : देशातल्या सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी आग्रही असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आता निवडणुकांसाठी कायदाच करण्याची भूमिका घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत लवकरच विधेयक मांडलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात एकत्रित निवडणुका घेण्यासाठी एनडीएतल्या घटक पक्षांना त्यांनी सहकार्य करण्यात आवाहन केलं. 


तसंच इतर पक्षांसोबतही सकारात्मक चर्चा करण्यावर भर देण्याचा आग्रह त्यांनी धरला.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महिनाभरातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असंही मोदींनी नमूद केलंय.


विरोधकांनी एकत्रित निवडणुकांना विरोध दर्शवलाय. त्यामुळं सर्वसहमतीनं हा निर्णय होत नसेल तर लोकसभेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक पारित करण्याचे संकेतच आता मोदींनी दिले आहेत.