Uttarakhand Lehenga broke the wedding : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांच्या लग्न (marriage) घरात तयारीची लगबग सुरु आहे. नववधू (Bride) आणि नवरदेवाकडे (Groom) आनंदाचं वातावरण...सनईचौघांचा सूर, पाहुण्याची रेलचेल, महिलांमध्ये साड्या आणि दागिन्यांची चर्चा, हातावर मेहंदीचा सुगंध...पण स्वप्नात कधी विचार केला नाही, असं काहीशी बातमी घरात आली नाही क्षणात सर्वत्र एकच शांतता पसरली.  नवऱ्याकडच्यांची एक चूक भारी पडली आणि नवरीचा राग अनावर झालं...आणि काही दिवसांवरील लग्न मोडलं. कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 


लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरीसाठी लहंगा आणि नवरदेवासाठी  शेरवानी (Sherwani) घेण्यासाठी अनेक जण खरेदीसाठी जातात. तर तुम्ही नवरीसाठी लहंगा (Bridal Lehenga)घेण्यासाठी जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा.  वधूसाठी नवरदेवाने खास लखनऊवरून लहंगा मागवला. जवळपास 10 हजारांचा हा लहंगा वरपक्षाला भारी पडला आहे. कारण वधूला हा लहंगा आवडला नाही म्हणून तिने थेट लग्नच मोडलं (Bride Cancels Marriage). या बातमी नंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. (Lehenga broke the wedding Uttarakhand news virel on social media nmp)


नेमकं काय आहे प्रकरण?


मुलीचं आणि मुलाचं जून महिन्यात साखपुडा झाला होता. 5 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र एक लहंगा त्यांचं लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलं. मुलाकडच्यांनी मुलीसाठी 10 हजारांचा लहंगा पाठवला. वधूला हा लहंगा आवडला नाही (Cheap Lehenga). तिने तो लहंगा फेकून दिला. वराच्या वडिलांनी मुलीला तिच्या आवडीचा लहंगा खरेदी करण्यासाठी त्यांचं एटीएम कार्डही दिलं. पण वधूचा राग काही कमी होई ना. अखेर तोडगा काढण्यासाठी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग दोन्ही पक्षांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. हे घटना उत्तराखंडमधील आहे.