राजकोट : Lemon as wedding Gift in Rajkot:गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव 'आंबट' करत आहेत. लिंबाच्या दर, देशाच्या अनेक भागांत 400 रुपये किलोच्या जवळपास पोहोचले आहे. अनेक ठिकाणी एक लिंबू 10 ते 15 रुपयांना मिळत आहे. महागलेल्या लिंबांमुळे लग्नातही लोक लिंबू भेट म्हणून देत आहेत.


धोराजी नगरमध्ये अनोखी लग्न भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील राजकोटमधील धोराजी शहरात लग्न समारंभात लोकांनी वराला लिंबू भेट दिले. दिनेशने वधु वर यांना लिंबू भेट दिले त्यावर तो म्हटला की,'सध्या लिंबाच्या किमती संपूर्ण देशापेक्षा तुमच्या राज्यात खूप वाढल्या आहेत. या उन्हाळ्यात लिंबाची खूप गरज असते. त्यामुळे खूप विचार करून हा निर्णय घेतला.



शहरातील मोनपरा कुटुंबातील मुलाच्या लग्न समारंभात मित्रांनी मिठाईच्या डब्यात पैसे किंवा दागिन्यांऐवजी महागडे लिंबू भेट दिले. लिंबूच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, ते आता महागडे गिफ्ट म्हणून दिले जाऊ शकते. त्यांच्या भेटवस्तुमुळे सर्व वऱ्हाडी - पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले.


लिंबाच्या बागेत गस्त आणि पहारा


लिंबूच्या दरांनी बाजारात मोठी उसळी घेतली आहे. भाजी मंडईतील दुकानदारांपासून ते लग्न कार्यालयाजवळ विक्रेते-ग्राहक लिंबूच्या वाढलेल्या दरामुळे हैराण झाले आहेत. लिंबाच्या बागेतील पिकांची चोरी झाल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. लिंबू चोरीला जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गस्त वाढवली आहे.