त्रिपुरातल्या निकालानंतर हिंसा, भाजप कार्यकर्त्यांनी पाडला लेनीनचाचा पुतळा
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच हिंसेला सुरुवात झालीय.
आगारतळा : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच हिंसेला सुरुवात झालीय. भाजप कार्यकर्त्यांनी त्रिपुरामधला लेनीनचा पुतळा बुलडोजरनं जमीनदोस्त केलाय. भाजपचे काही कार्यकर्ते भारत माता की जयच्या घोषणा देत आले आणि या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर बुलडोझरही आणला. त्याच बुलडोझरच्या मदतीनं लेनीनचा पुतळा पाडण्यात आला.
या घटनेनंतर त्रिपुरात हिंसक पडसाद उमटायला सुरुवात झालीय. संवेदनशील भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसंच त्रिपुरातल्या माकपच्या कार्यालयालाही आग लावण्यात आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांनी त्रिपुराच्या राज्यपालांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामींनी पुतळा हटवण्याचं समर्थन केलंय.