LIC Dhan Vriddhi Scheme: भविष्याच्या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदींमध्ये एलआयसीचा हमखास समावेश असतो. किंबहुना जिथं अनेक खासगी पॉलिसी आणि तत्सम योजनांची रिघ लागलेली आहे तिथं आजही अनेक मंडळी एलआयसीलाच प्राधान्य देताना दिसतात. ठेवीदारांची विश्वासार्हता जिंकलेल्या याच एलआयसीसंदर्भातील ही एक मोठी बातमी. किंबहुना तुम्हीही LIC पॉलिसी काढायच्या विचारात असाल तर ही माहिती लक्षपूर्वक वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी, अवघ्या 5 दिवसांनंतर एलआयसीकडून त्यांची एक पॉलिसी बंद करण्यात येणार आहे. या विमा योजनेचं नाव आहे LIC Dhan Vriddhi Plan. ही एक सिंगल प्रिमियम योजना असून, त्याबाबत संस्थेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


तुम्ही अजूनही या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले नाहीयेत? 


LIC च्या धन वृद्धी पॉलिसीमध्ये तुम्हाला एकदाच पैसे गुंतवावे लागतात. या एकदाच केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता. यामध्ये ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देण्यासोबतच त्यांच्या ठेवीतून त्यांना फायदा कसा मिळेल हा प्राथमिक हेतू साधला जातो. शिवाय या योजनेतून तुम्हीही केव्हाही बाहेर पडू शकता. 


काय आहेत या Policy ची वैशिष्ट्ये? 


LIC धन वृद्धि प्लानमध्ये तुम्ही 10, 15 आणि 18 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. 


एलआयसीच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वय किमान 90 दिवस म्हणजेच 3 दिवस असणं अपेक्षित आहे. 


80 C अंतर्गत या योजनेतून तुम्हाला 1.5 लाख रुपयांची करसवलतही मिळते. या योजनेतून तुम्हाला 1,25,000 रुपयांचा परतावा हमखास मिळतो. 


हेसुद्धा वाचा : Video : जम्मू काश्मीरमध्ये आभाळातून बरसला कापूस; मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर खुललं निसर्गसौंदर्य 


 


23 जूनपासून सुरु झालेल्या या प्लानमध्ये तुम्हीही पैसे गुंतवू इच्छित असाल, तर शेवटच्या पाच दिवसांमध्ये आर्थिक गणितं निकाली काढा. तुम्ही वैयक्तिक गुंतवणूक, बचत आणि एकल प्रिमियमसाठीच्या एखाद्या योजनेच्या शोधात असाल तर, हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. तुम्हीही या योजनेमध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल, तर एलआयसी एजंट आणि एलआयसीच्या एखाद्या शाखेशी संपर्क साधा. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेवर एलआयसीकडून कर्जाची सुविधाही देण्यात येते. योजनेत पैसे गुंतवल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून तुमच्यासाठी ही सुविधा लागू असते.