गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली! या दिवशी LIC चा IPO खुला होणार; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
LIC IPO UPDATE : जेव्हापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओची घोषणा केली. तेव्हापासून आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे.
नवी दिल्ली : जेव्हापासून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओबाबत अपडेट दिले आहे. तेव्हापासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा आयपीओ 10 मार्च रोजी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2100 रुपयांपर्यंत असू शकते बेस प्राइज
सरकारतर्फे एलआयसीचा आयपीओ खुला होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची इश्यू प्राइज 2000-2100 रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. रविवारी सेबीला दिलेल्या कागदपत्रांच्या अंदाजाने हा आयपीओ 63000 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.
14 मार्चपर्यंत खुला होऊ शकतो आयपीओ
सूत्रांचे म्हणणे आहे की, 10 मार्च रोजी खुला होणाऱ्या या आयपीओला 14 मार्चपर्यंत सब्सक्राइब करण्यासाठी वेळ मिळू शकतो. या आयपीओमध्ये पॉलिसीधारकांसाठी 10टक्के हिस्सा राखीव असणार आहे. पॉलिसी होल्डर्स आणि कर्मचाऱ्यांना यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे.