LIC IPO | अखेर ठरलं; एलआयसीचा आयपीओ `या` तारखेला बाजारात येणार
LIC IPO Launch Date: सरकार IPOद्वारे आयुर्विमा महामंडळातील (LIC) 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे.
मुंबई : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा बहुप्रतिक्षित IPO 4 मे रोजी उघडेल आणि 9 मे 2022 रोजी बंद होईल. सरकार IPOद्वारे आयुर्विमा महामंडळातील (LIC) 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत 21 हजार कोटी रुपये जमा होतील.
वित्त मंत्रालयाने LIC चा आयपीओ मार्चपर्यंत लॉन्च करण्याची योजना आखली होती. परंतु रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे हे नियोजन पुढे ढकलावे लागले.या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार 21,000 कोटी उभारणार आहे.
तारीख ठरली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी बोर्ड मंगळवारी यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे. ज्यामध्ये लॉन्चच्या तारखेवर शिक्कामोर्तब होईल. आधी सरकार LIC मधील 5% स्टेक विकणार होते, पण आता सरकारने IPO साठी फक्त 3.5% शेअर्स ऑफर केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, जर बाजारात मागणी चांगली असेल तर सरकार त्यात 5% पर्यंत वाढ करू शकते.
फेब्रुवारीमध्ये दस्तऐवज जमा
सरकारने फेब्रुवारीमध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) कडे एलआयसीचे ड्राफ्ट पेपर जमा केले होते. LIC चा IPO हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल आणि पेटीएमचा 18,300 कोटी रुपयांचा विक्रम पार करेल.