मुंबई : इंडियन आर्मीच्या लेफ्टनेंटने धाडस दाखवत दरोडेखोरांचा प्रयत्न हाणून पाडला. दादर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या युवती झोपेत असतांना अचानक तेथे 2 दरोडेखोर आले. ही घटना 6 मेची आहे. पहाटे 3.30 वाजता मुंबई ते अमृतसर या दादर एक्‍सप्रेसमध्ये ही घटना घडली. ही ट्रेन फरीदाबाद रेल्वे स्‍टेशनवरुन निघाल्यानंतर अचानक कोणीतरी चैन खेचली. ट्रेन थांबताच एसी टू टायरच्या कोच नंबर ए-1 मध्ये दोन दरोडेखोर घुसले. दोन्ही दरोडेखोर संपूर्ण कोचमध्ये पाहणी करत होते. त्यातच त्यांची नजर लोअर बर्थवर झोपलेल्या एका युवतीवर पडली. याचा फायदा घेत दरोडेखोर त्या युवतीचं सामान घेऊन निघाले. पण लेफ्टनंटने दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. कागी दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कॉन्स्टेबलने धाडस दाखवत एका महिलेची अब्रु वाचवली होती.


दरोडेखोरांनी दाखवला सुरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघे दरोडेखोर सामान घेऊन जात असताना लेफ्टनंट आशीषने त्यांना रोखलं. दरोडेखोरांनी त्यांच्या जवळचा सुरा काढला. पण त्यांना माहित नव्हतं ज्याला ते सुरा दाखवत आहेत तो भारतीय लष्कराचा अधिकारी आहे. लेफ्टनंट आशीषवर या दरोडेखोरांनी सुऱ्याने अनेक वार केलेत. ज्यामध्ये एक हात गंभीरपणे जखमी झाला. पण लेफ्टनंट आशीषने त्यांना सोडलं नाही. शेवटी दरोडेखोर ट्रेनमधून उतरुन फरार झाले.



दरोडेखोरांचा शोध सुरु


दिल्‍ली रेल्वे पोलिसांच्या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्यानुसार या दरोडेखोरांचा शोध सुरु झाला आहे. लेफ्टनंट आशीष मुंबईहून दादर एक्‍सप्रेसने अंबाला येथे चालला होता. अंबाला येथे तो आर्मी बेस कॅम्पमध्ये तैनात आहे. लेफ्टनंट आशीषच्या या धाडसाचं पोलिसांनी आणि युवतीने कौतूक केलं.