रांची : आयएएस (IAS) अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने एकाचवेळी 20 ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 25 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IAS अधिकारी पूजा सिंघल कोण आहेत? 


पूजा सिंघलचा जन्म देहरादूनचा. देहरादूनच्या गढवाल विश्वविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पूजाने पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा पास केली. शाळेपासून विश्वविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत पूजाचे नाव टॉपरच्या लिस्टमध्ये असायचे. आयएएस झाल्यानंतर तिने अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे ती चर्चेत राहिली. 


लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पूजा सिंघलचं नाव -


वयाच्या 21व्या वर्षी पूजा सिंघलने IAS कॅडरमध्ये प्रवेश मिळवला. 2000 सालच्या बॅचमधून पूजाने IASची परीक्षा पास केली. सर्वात कमी वयाची असल्यामुळे पूजाचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं. 


IAS अधिकारी पूजा सिंघलचं वैवाहिक जीवन - 


IAS अधिकारी झाल्यानंतर पूजा सिंघलचं पहिलं लग्न IAS अधिकारी राहुल पुरवारसोबत झालं. मात्र लग्नानंतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सततच्या वादामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर पूजाने दुसरं लग्न केलं. 


कोण आहे पूजा सिंघलचा दुसरा पती?


पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेक झा बिहारच्या मुजफ्फरपूरचा आहे. मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा तो संचालक आहे. 


पूजा सिंघल यांच्यावर EDची कारवाई - 


मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी सकाळी सहा वाजल्यापासून छापे टाकण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, फरीदाबाद, गुरुग्राम, मुझफ्फरपूर, रांची आणि इतर शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले. पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेकच्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह सहा ठिकाणी झडती घेण्यात आली. 


25 करोडची रोकड जप्त



ईडीने पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या रांचीतल्या कार्यालयतून 25 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्या चौकशीनंतर हे छापे टाकण्यात आले. 


सिन्हा सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत. पूजा सिंघल यांनी वेलफेअर पॉइंट आणि प्रेरणा निकेतन या दोन स्वयंसेवी संस्थांना 6 कोटी रुपयांच्या निधीसाठी भाग पाडलं होतं असा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पूजा सिंघल यांच्यावर चतरा, पलामू, खुंटी जिल्ह्यांमध्ये उपायुक्त असताना मनरेगामध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे.


का करायची पूजा असे घोटाळे?


पूजा अति महत्वाकांक्षी असून पती आणि सासरच्या लोकांच्या व्यवसायात फायदा करुन देण्यासाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असे असा आरोप तिच्यावर करण्यात आलाय.


एके काळी लिम्का बुकमध्ये आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नाव झळकावणारी पूजा पतीच्या व्यवसायाला मदत व्हावी म्हणून नको त्या मार्गाला लागली आणि ईडीच्या जाळ्यात फसली.