मुंबई : जंगलाचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. इथे जगायचे असेल तर कुणाला तरी मरावंच लागेल. प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी खाण्याची गरज असते. जंगलातील शाकाहारी प्राणी तर तेथील चारा, गवत आणि फळं खाऊन आपलं पोट भरतात. मात्र मांसाहारी प्राणी आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतात. मांसाहारी प्राणी एकमेकांची शिकार करतात आणि आपलं पोट भरतात. जंगलात लहान प्राण्यांची शिकार मोठे प्राणी करतात. परंतु फार कमी वेळा असे होते शिकारीच शिकार होतो, म्हणजेच फार कमीवेळी मोठे प्राणी एकमेकांची शिकार करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्यवाटेल.


जंगलामध्ये चित्ता हा अतिशय क्रूर शिकारी मानला जातो. काही सेकंदात आपली शिकार पकडतो आणि आपली सर्व कामे करतो. पण शेवटी सिंह हा सिंह असतो. त्याच्यासमोर कोणाचीही हुशारी कामी येत नाही. इथे त्याच्या समोर कोणी चालत नाही. त्यामुळेच त्याला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते.


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिंह चित्त्यावर तुटून पडतो, त्यावेळी चित्त्याचा वेग काहीही कामाचा राहत नाही. तसे पाहाता चित्ताने जर का तेथून पळाला असता, तर तो सिंहाच्या हाती लागलाच नसता, परंतु सिंह चित्त्याची अशी काही शिकार करतो की, त्याला तेथून पळताच येत नाही. यानंतर चित्त्याचे काय होते हे तुम्हीच पाहा.


व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये दोन सिंह एका चित्त्याच्या मागे धावताना दिसत आहेत. यादरम्यान, सिंह अचानक वेग वाढवतो आणि चित्त्यावर तुटून पडतो. यानंतर तो त्याची मान जबड्यात पकडतो. व्हिडीओ पाहून असे वाटते की, चित्त्याचा खेळ संपला असावा.


मात्र हा व्हिडीओ अर्धाच आला आहे, त्यामुळे पुढे नक्की काय घडलं याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तसे पाहाता चित्ता उग्र चपळ असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र, सिंहाच्या तावडीत आल्यानंतर एखाद्याची शिकार झालीच म्हणून समजा.


wild_animals_creation नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. जेव्हापासून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे, तेव्हापासून त्याला 2 लाख 58 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.


ही संख्या सातत्याने वाढत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओपाहून अनेक युजर्स दु:खी झाले आहेत. लोक म्हणतात की, हा' चित्ता आजारी असावा, नाहीतर धावत जाऊन चित्ता पकडण्याची हिंम्मत सिंहा करत नाही.' काही लोकांनी असेही म्हटले आहे की, 'सिंहाने चित्त्याची शिकार केली असा प्रकार क्वचितच दिसून येतो, कारण चित्ता अतिशय चपळ असतो.'