मुंबई : सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. जंगलातले प्राणीच काय पण लोकही त्याला घाबरूनच असतात. सिंह कधी हल्ला करेल याचा काही नेम नाही. मात्र सोशल मीडियावर याच्या अगदी उलट व्हिडीओ पाहायला मिळत आहे. एका तरुणाला पाहून सिंहाची पळताभुई थोडी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिंह तरुणाच्या हातातील काठी पाहून त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी धूम ठोकताना दिसत आहे. या सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


या व्हिडीओमध्ये तरुणाच्या हातात काठी दिसत आहे. तो या काठीचा धाक दाखवून सिंहाला तो पळवून लावतो. सिंहाच्या गर्जनेनं अंगावर काटा येतो आणि भीतीने जिथे बोबडी वळते. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसाव की... असा प्रश्न पडला आहे. 


हा व्हिडीओ animals_powers नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. सिंह चक्क माणसाला घाबरतोय असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.