लखनऊ : या क्षणाची सर्वात मोठी बातमी (Big Braking) समोर आली आहे. दारुच्या दुकानाचं छत कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत 10-12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जातंय. (liquor shop slabs collapsed at agra more than 10 people injured in incident)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीप्रमाणे काही मद्यपी दारु पित होते. मात्र अचानक दारुच्या दुकानांचं स्लॅब कोसळला. त्यामुळे छत कोसळण्यानंतर दारू दुकानात प्रचंड गोंधळ झाला. या दुर्घटनेत 10 ते 12 जण ढिगा-याखाली अडकले. त्यापैकी 7 जण जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. 


घटना घडल्याचं समजताच स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. यामधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या जखमी 7 जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं माहिती आहे. सदर दुर्घटना ही आग्र्यात घडली आहे.