Little Baby Completes Shlokas Video Viral: सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, काही दिवसातच व्हायरल होतात. असाच एका बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयात बाळाना साधे शब्द उच्चारता येत नाही. त्या वयात इतकं बोलणं किंवा संस्कृत श्लोक बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे. काही महिन्यांचं बाळ संस्कृत श्लोक बोलताना या व्हिडीओत दिसत आहे. अनेकांना या व्हिडीओवर विश्वास बसत नाही. तर अनेकांनी कलियुगातील अभिमन्यु असल्याची उपमा दिली आहे. या व्हायरल व्हिडीओ एक महिला संस्कृत श्लोक उच्चारत असल्याचं ऐकायला येतं. त्यानंतर ते बाळ त्या श्लोकाचं शेवट करतं. इतकंच काय तर त्या बाळाचे उच्चार इतके स्पष्ट आहेत की, विश्वास बसणं कठीण वाटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ निवृत्त लष्कर अधिकारी मेजर गौरव आर्या यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. 



पुंसवन संस्कारामुळे बाळाला संस्कृत बोलता येत असावं असं काही नेटीझन्सचं मत आहे. पुंसवन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी दुसरा संस्कार आहे. स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर बाळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा संस्कार केला जातो. गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत हा संस्कार केला जातो.