LIVE Accident: पावसाळा (rainy season) आणि रस्त्यावर खड्डे (Pothole) जणू काही दरवर्षीचं समीकरणचं ठरलं आहे. भारतात कुठल्याही कानाकोपऱ्यात जावं रस्त्यांवर खड्डे ही खूप सर्वसामान्य समस्या झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा नाहक बळी गेला आहे. अनेक जण या खड्ड्यांमुळे गंभीर जखमी झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेक रस्ते अपघात (Roads Accident) झाले आहेत. हे अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैदही होतात. मात्र या समस्येतून कधी मुक्ती मिळेल हे कोणालाही सांगता येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज चॅनेलवर (News Channel) अनेक वेळा रस्ते आणि खड्डे यांवर स्टोरी करताना पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (viral) झाला आहे. आपल्या भागातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोक कसे त्रस्त आहेत हे कोणाला दाखवायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ  (video) जरूर पहावा. (live accident bad road e rickshaw fell into pothole Treading video on Social media nm)


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील (UTTAR PRADESH) बलियामधील (Ballia) एक प्रवासी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची तक्रार करताना दिसत आहे. रस्त्यावरून प्रवास करणं किती कठीण आहे आणि त्यामुळे ई-रिक्षा कशा वळण घेत आहेत याबद्दल तो माणूस बोलतो. ते रिपोर्टरच्या (Reporter) कॅमेऱ्यासमोर रस्त्याच्या समस्येबाबत बोलत असताना पाठीमागे धक्कादायक अपघात झाला. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या माणसाच्या मागून एक ई-रिक्षा (E-Rickshaw)आली आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. ई-रिक्षात बसलेले प्रवासीही त्या खड्ड्यात पडले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zee News (@zeenews)


कॅमेऱ्यासमोर खड्ड्यात ई-रिक्षा पडली 


या अपघातात (accident) एक महिलाही जखमी झाल्याचं दिसून आल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा व्हिडिओ पियुष राय (Piyush Rai) नावाच्या युजरने ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.