Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: एक्झिट पोलनुसार कोणाला धक्का, कोणी मारली बाजी? पाहा प्रत्येक अपडेट

Sat, 01 Jun 2024-8:05 pm,

Exit Poll Results 2024 Lok Sabha Election: देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Latest Updates: लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यं आणि एका केंद्राशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे. मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून यानंतर थेट निकालाची प्रतिक्षा असणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार असून, यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल असेल याचीही प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 


दरम्यान निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहेत. Zee News चा एक्झिट पोलही 5 वाजल्यानंतर जाहीर होणार आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं स्पष्ट नाही, मात्र अंदाज देणारं चित्र स्पष्ट होईल. 

Latest Updates

  • रिपब्लिक टीव्ही-पी मार्क एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, 'पुन्हा मोदी सरकार!'

    रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 359 जागा मिळून ते तिसऱ्यांदा सत्तेत परतत आहे. या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना 30 जागा मिळाल्याचे दाखवले आहे.

  • रिपब्लिक भारत-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार दिल्लीत एनडीएला 5-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 0 ते 2 जागा मिळू शकतात.

  • टाईम्स नाऊ-ईटीजी रिसर्चचा एक्झिट पोल: झारखंडमध्ये निकाल कसा लागेल?

    टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागांपैकी भाजपला 13 जागा तर काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकता आली आहे.

  • (Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी ZEE NEWS जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)

  • तामिळनाडूपाठोपाठ केरळचीही आकडेवारी समोर आली आहे. येथे लोकसभेच्या 20 जागा आहेत. काँग्रेसला 13 जागा मिळू शकतात. सीपीआय (एम)ला 2 जागा मिळू शकतात, तर सीपीआयला 1 जागा मिळू शकते. येथे भाजपचे खाते उघडत आहे. त्यांना 1 जागा मिळू शकते.

  • कर्नाटकात एनडीएला 55 टक्के मते मिळाली आहेत. जागांच्या बाबतीत बोलायचे झाले तर एनडीएला 20 ते 22 जागा, इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा आणि जेडीएसला 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत.

  • ॲक्सिस माय इंडियाने आपल्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये भाजपला 1-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे. येथे 39 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 35 तर एनडीएला 4 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

  • एक्झिट पोलचा पहिला आकडा समोर आलाय. जो तामिळनाडू राज्याचा आहे. येथे 39 लोकसभा जागांपैकी इंडिया आघाडीला 35 तर एनडीएला 4 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  एक्झिट पोलआधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक 

    एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी काही तास आधीच इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी घेण्यात येणाऱ्या या बैठकीसाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक आघाडीचे नेतेही हजर असल्याचं पाहायला मिळालं. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  भाजपला 140 हून अधिक जागा मिळणं अशक्य 

    इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपला 140 हून अधिक जागा मिळवता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. यावेळी जनताही भाजपविरोधात उभी राहिली असल्यामुळं त्यांना 400 पार सोडा, पण 140 पेक्षाही अधिक जागा मिळू शकणार नाहीत असं ते म्हणाले. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  कोणत्या टप्प्यात किती मतदान झालं होतं? 

    टप्प्यांनुसार मतदानाची आकडेवारी पाहायची झाल्यास देशात पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के, पाचव्या टप्प्यात 62.2 आणि सहाव्या टप्प्यात 63.36 टक्के इतकं मतदान झालं. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  एक्झिट पोलनंतर पंतप्रधानांच्या नावे होणार हा विक्रम 

    एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच बाजूनं कल दिसले आणि प्रत्यक्षातही तेच देशाचे पंतप्रधान झाले, तर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी येणारे आणि एक्झिट पोलमध्येही त्यांच्याच कलानं निकाल असणारे मोदी ही देशातील पहिले नेते असणार आहेत. त्यामुळं एक्झिट पोलमुळं मोदींच्या नावे हा विक्रमच होणार, असं म्हणायला हरकत नाही. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates:  2014 च्या एक्झिट पोलमध्ये कोणाचं पारडं होतं जड? 

    2014 मध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएच्या वाट्याला 283 आणि युपीएला 105 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावेळी एनडीएला प्रत्यक्षात मात्र 336 जगांवर विजय मिळवता आला होता. तर, युपीएला अवघ्या 60 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांची भविष्यवाणी

    राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. पण त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील युती 400 चा आकडा पार करु शकणार नाही असं म्हटलं आहे. तर योगेंद्र यादव यांनी भाजपाला 240 ते 260 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एनडीएला 35 ते 45 जागा मिळतील असं म्हटलं आहे. 

     

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: काँग्रेसचा एक्झिट पोलवर बहिष्कार

    काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकला आहे. आज संध्याकाळी सर्व टीव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोलचे निकाल दाखवले जातील. तसंच त्यावर चर्चाही होतील. काँग्रेस या चर्चांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: भारतात पहिला एक्झिट पोल कधी झाला?
     

    भारतात 1957 मध्ये दुसऱ्या सार्वजनिक निवडणुका झाल्या होत्या. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपनिअने तेव्हा एक्झिट पोल केला होता. हा भारताचा पहिला एक्झिट पोल होता. यानंतर 23 वर्षं कोणताही एक्झिट पोल झाला नाही. 

     

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: एक्झिट पोलचा नियम काय असतो?

    रिप्रेजेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट 1951 नुसार जोपर्यंत सर्व टप्प्यातील मतदान पार पडत नाही तोपर्यंत एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकत नाहीत. जर एखाद्याने या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला 2 वर्षांची कैद किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. 

  • Exit Poll Lok Sabha Election 2024 Live News Updates: 2019 मध्ये काय होते एक्झिट पोलचे निकाल?

    2019 मध्ये जवळपास 13 एक्झिट पोलमध्ये एनडीएला सरासरी 306 आणि युपीएला 120 जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले होते. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा एनडीएला 353 आणि युपीएला 93 जागा मिळाल्या. भाजपाने एकट्याने 303 आणि काँग्रेसन 52 जागा जिंकल्या होत्या.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link