Madhya Pradesh Election Result 2023 Live : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा राजीनामा

Sun, 03 Dec 2023-7:05 pm,

Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्यप्रदेशात कोणाची सत्ता येणार याचा फैसला आज होणार आहे. 230 जागांसाठी आज मतमोजणी होणार असून भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं चुरशीची लढत होणार आहे.

Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Latest Updates

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा राजीनामा

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. भाजपने 104 जागा जिंकल्या असून सध्या 11 जागांवर आघाडीवर आहे.

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतलं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. जनतेने पुन्हा एकदा भाजपाला भरभरुन मतं दिली आहे. 230 जागा असलेल्या मध्यप्रदेशमध्ये बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता असते. भाजपने 160 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 65 जागांवर अडकली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार निश्चित झालं आहे. पण शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की इतर कोणावर जबाबदारी सोपवणार याचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल. 

     

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये कलानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत, भाजप 131 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसला 87 जागा, निकालानंतर भाजपचे शिवराजसिंग चौहान यांचं ट्विट, आम्ही सरकार बनवणार असं ट्विटमध्ये त्याने म्हटलंय.

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट, काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदावर कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. 

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, सुरुवातीच्या कलानुसार मध्यप्रदेशमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय. भाजपमध्ये 121 जागांवर तर काँग्रेस 100 जागांवर आघाडीवर आहे. 

     

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 96 जागांवर काँग्रेस तर 93 जागांवर भाजप आघाडीवर आहे. इतर पक्षांनी दोन जागेवर खातं खोललं आहे. 

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 63 जागांवर काँग्रेस तर 54 जागांवर भाजप आघाडीवर आहे. इतर पक्षांना एका जागेवर खातं खोललं आहे. 

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीची मतमोजी, भाजप आणि काँग्रेसमध्य अटीतटीची लढाई सुरु आहे. काँग्रेसने आघाडी घेतली असून 47 जागांवर काँग्रेस तर 44 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

     

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live

    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप 40 जागांवर तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस 6 जागा तर भाजपला 9 जागांवर आघाडीवर आहे.

  • Madhya Pradesh Election Result 2023 Live
    मध्यप्रदेशमध्ये 230 जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. 

  • थोड्याचवेळात मतमोजणी
    मध्यप्रदेशमध्ये आता थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी केंद्रावर अधिकारी आणि उमेदवारांचे कार्यकर्ते पोहचले आहेत. भोपाळमध्ये अधिकाऱ्यांची मोठी लगबग दिसत आहे. 

  • मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात 

    होशंगाबादमध्ये दोन भावांमध्ये ही लढत होत आहे. भाजपच्या सीताशरण शर्मांविरोधात काँग्रेसकडून गिरीजाशंकर शर्मा उभे आहेत. एक विद्यमान आमदार तर एक माजी आमदार आहेत. पूर्वी दोघेही भाजपमध्ये होते.

  • मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात 

    चाचोडामध्ये काँग्रेसचे लक्ष्मण सिंग विरुद्ध प्रियंका मीना यांच्यात थेट लढत होतेय.. 2018 मध्ये लक्ष्मण सिंग यांनी भाजपचा ममता मीना यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. ममता मीना यांना यावेळी तिकीट अपेक्षित होतं. मात्र काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका मीना यांना भाजपनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे ममता मीना यांनी बंडखोरी केली आहे.

  • मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात 
    ग्वाल्हेर पूर्वमधून भाजपच्या मायासिंग विरुद्ध काँग्रेसच्या सतिश सिकरवार यांच्यात लढाई आहे.. 2018  मध्ये या मतदारसंघातून ज्योतीराधित्य शिंदे यांचे समर्थक मुन्नालाल गोयल निवडूण आले होते. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुन्नालाल गोयल यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना आता तिकीट नाकारण्यात आले आहे. तिकीट नाकरल्यानंतर त्यांनी मोठा गदारोळ केला होता. माया सिंग यांच्यावर जोरदार टीकाही केली होती.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link