Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरी

Thu, 10 Oct 2024-9:05 pm,

Maharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Ratan Tata death LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यासह मुंबई शहरात आजच्या दिवशी घडणाऱ्या सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर... 


Latest Updates

  • मुंबईत पावसाच्या  जोरदार सरी

    वीजांच्या कडकडाटासह मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. परतीच्या पावसाने मुंबईत जोर धरला आहे. 

  • सिल्वर ओकवर संजय राऊतांनी घेतली शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट

    गुरुवारी सिल्वर ओकवर जाऊन शिवसेनेचे संजय राऊत यांनी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेतली. तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती असून महाविकास आघाडीत 200 जागांचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर उर्वरित जागांवर लवकरच महाविकास आघाडीत होणार चर्चा होणार आहे. आघाडीचे नेते मुंबई बाहेर विविध मतदारसंघातली दौऱ्यावर असल्याने उद्याची नियोजित पत्रकार परिषद दसऱ्यानंतर घेतली जाईल अशी माहिती देण्यात आली. 

  • रतन टाटा अनंतात विलीन, वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार 

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी बुधवार 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5 :30 च्या सुमारास वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. 

  • रतन टाटांना अखरेचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत प्रचंड जनसमुदाय दाखल

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी आलेले VIP गेल्यावर तेथे  प्रचंड जनसमुदाय दाखल झाला. त्यामुळे स्मशानभूमीत गर्दी झाली. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता टाटांचे नातलग आणि  जवळच्या  मित्र परिवारातील लोक यायला सुरुवात झाली असून कम्युनिटी हॉलमध्ये सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे. 

  • रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात 

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA  येथे ठेवण्यात आलं होतं. दुपारी ४ चा सुमारास रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

  • रतन टाटांच्या अंत्ययात्रेला एमसीएतून सुरुवात 

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एमसीए येथे ठेवण्यात आलं होतं. दुपारी 4 च्या सुमारास रतन टाटांच्या अंत्ययात्रेला एमसीएतून सुरुवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

     

  • गृहमंत्री अमित शहांनी घेतलं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन 

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून रतन टाटा यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी एमसीए येथे ठेवण्यात आलंय. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 

  • गृहमंत्री अमित शहांनी घेतलं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन 

    टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून रतन टाटा यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी एमसीए येथे ठेवण्यात आलंय. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 

  • ...तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो- नाना पटोले

     

    Nana Patole : मी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय.. भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता भावी हे भाविच राहतील अशी टीका केली होती.. त्या टीकेला नाना पटोलेंनी आज उत्तर दिलंय... पाहुयात नाना पटोले नेमके काय म्हणालेत.. 

  • महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार - मंत्री उदय सामंत 

    टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनाचे दुःख म्हणून राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी बीएमसी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून नियोजन 

    मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून रतन टाटा यांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यविधींचे नियोजन केलं जात आहे. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर संध्या ५ वाजता अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी महापालिकेकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रतन टाटांना निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.  स्मशानभूमीतील- कम्युनिटी हॉल येथे सामुहिक प्रार्थना होईल. मुंबईत पावसाची शक्यता असल्यानं वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला जाणार आहे. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी होणारी गर्दी आणि व्हिआयपी लक्षात घेता पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: माजी खासदार सुभाष चंद्रा यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली 

    राज्यसभेचे माजी खासदार सुभाष चंद्रा यांनी X च्या माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'रतनजींच्या जाण्यानं प्रचंड दु:ख झालं. त्यांची दूरदृष्टी आणि भारतीय उद्योगजगतावर त्याचे परिणाम वाखाणण्याजोगे आहेत. व्यावसायिक कारणांनी आमचा कायम संवाद होत असे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासमवेत आहोत...' असं त्यांनी लिहिलं. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: दैवत हरवलं; रतन टाटांच्या निधनानं टाटा मोटर्सच्या कामगारांना भावना अनावर 

    पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी ही ओळख निर्माण करण्या मध्ये टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. टाटा मोटर्स मुळे शहरातील हजारो कामगारांना रोजगार उत्पन्न झाला. टाटा मोटर्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाने दैवत हरवल्याची भावना कामगारांनी व्यक्त केलीय. 

    हेसुद्धा वाचा : रतन टाटा म्हणजे Inspiration! त्यांचे हे Quotes तुम्हाला आयुष्यभर देतील प्रेरणा

     

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची गर्दी 

    रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास, आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 'त्यांचं निधन ही संपूर्ण देशासाठी दु:खद बाब असून, त्यांच्या कामाची कोणासोबतची तुलना होऊच शकत नाही. त्यामुळं त्यांच्या कामाच्याच श्रीमंतीतून आपण सर्वांनी त्यांना कायम स्मरणात ठेवलं पाहिजे', असं ते म्हणाले. 

     

  • Ratan Tata funeral LIVE updates: शरद पवारांकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली 

    एनसीपीएमध्ये शरद पवार यांच्यासह त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतलं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन. टाटा कुटुंबीयांची भेट घेत तेलं सांत्वन. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: एनसीपीएत सर्वधर्मीय प्रार्थना... 

    रतन टाटा यांचं पार्थिव एनसीपीएमध्ये पोहोचल्यानंतर तिथं सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली. टाटा कुटुंबीय यावेळी इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेतेमंडळींनी घेतलं रतन टाटा यांचं अंत्यदर्शन. 

    हेसुद्धा वाचा : 'ते म्हणतायत तू गेलायस, पण...' रतन टाटांसाठी सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

     

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात 

    मुंबईतील कुलाबा इथं असणाऱ्या निवासस्थानी मुंबई पोलिसांच्या सलामीनंतर रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. इथून त्यांचं पार्थिव एनसीपीए इथं नेण्यात येणार असून, तिथं सामान्यांना पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांना सलामी 

    मुंबई पोलिसांचे बँड पथक रतन टाटा यांना सलामी देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कुलाबा येथील निवासस्थानी दाखल झाला आहे. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मरिन ड्राईव्ह परिसरात वाहतुकीत बदल  

    रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए आणि नजीकच्या भागात तयारी सुरु करण्यात आली असून, इथं वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मरिन ड्राईव्ह इथं असणाऱ्या ओबेरॉय हॉटेलपाशी असणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी साधला त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद 

    रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा आणि टाटा कुटुंबीयांशी संवाद साधत श्रद्धांजली दिली, टाटा कुटुंबाला आधार दिला. अधिकृत माहितीनुसार केंद्र शासनाच्या वतीनं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यविधीसमयी उपस्थित राहतील. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: फक्त टाटा समुहासाठी नव्हे, तर सबंध भारतासाठी दु:खद दिवस... रतन टाटा यांच्या निधनानंतर रिलायन्स उद्योग समुहाकडून श्रद्धांजली. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्यावर कुठे होणार अंत्यसंस्कार? 

    रतन टाटा यांच्यावर वरळीतील पारसी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. इथं दुपारी 4 वाजल्यानंतर त्यांचं पार्थिव आणलं जाईल. ज्यानंतर इथं असणाऱ्या प्रार्थना सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि यानंतर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

  • Ratan Tata funeral LIVE updates: रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात दुखवटा 

    रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात आज गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीची घोषणा केली. रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील, तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. 

     

  • Ratan Tata funeral LIVE updates: सामान्यांना घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन 

    अधिकृत माहितीनुसार रतन टाटा यांचं पार्थिव मुंबईतील मरिन लाईन्स इथं असणाऱ्या NCPA Lawns इथं ठेवण्यात येणार असून, सकाळी 10.30 ते 4 वाजेपर्यंत सामान्यांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे. यानंतर रतन टाटा यांच्या पार्थिवाचा शेवटचा प्रवास सुरू होणार असून, वरळीतील डॉ. ई मोजेस रोड इथं असणाऱ्या स्माशानभूमीत ते दाखल होईल. 

  • Ratan Tata death LIVE updates:संपूर्ण देशावर शोककळा 

    प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. टाटा यांनी सोमवारी  दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. पण, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link