Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Surendra Gangan Sun, 12 Feb 2023-12:26 pm,

Union Budget 2023 Live Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना दिली.

Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 

Latest Updates

  • मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट - देवेंद्र फडणवीस

    Budget 2023 Updates : महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पाने सहकार क्षेत्राला महत्त्व दिलं आहे. आपल्या पतसंस्थांना मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय. त्यामुळे आता गावपातळीवर सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे.अमृत काळातील सर्वमान्य समाधानकारक अर्थसंकल्प आहे. पुढच्या काळात विकसीत भारत जाणारे हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्यांना पायाभूत सुविधा वाढण्यासाठी फायदा होणार आहे. 1 कोटी नैसर्गिक शेती साठी फायदा होणार आहे. शेती क्षेत्रात डिजिटल फायदा होण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच हे बजेट मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच - शशी थरुर

    Budget 2023 Updates : अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण यामध्ये मनरेगा योजनेचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. यासोबत ग्रामीण भागातील गरीब मजूर, रोजगार आणि महागाईबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी दिली आहे.

  • अर्थसंकल्पातून पहिल्यांदाच सामान्यांना मोठा दिलासा  - नितीन गडकरी

    Budget 2023 Updates : "अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे. आपला अर्थसंकल्पात देखील मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे रस्त्यांचा विकास आणि सुविधा निर्माण करण्याचा आमचा निर्धार पूर्ण होणार आहे. हरित प्रकल्पांमुळे आपल्या पर्यावरणाला मोठा फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्यांना प्रदूषणामुळे होत असलेला त्रास देखील कमी होणार आहे. पहिल्यांदाच सामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

  • मोठी घोषणा : 7  लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
     
    असा असेल नवीन टॅक्स स्लॅब
    Income    Tax %

    0 ते तीन लाख    0 %
    3 ते 6 लाख     5 %
    6 ते 9 लाख     10 %
    9 ते 12 लाख    15 %
    12 ते 15 लाख    20 %
    15 लाखांपेक्षा जास्त    30 %

  • Income tax slab बाबत मोठी घोषणा

    Budget 2023 Updates :  Income tax slab बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 7  लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त  झाले आहे.

  • सिगारेट महाग तर टीव्ही, मोबाईल स्वस्त; अर्थमंत्र्यांची घोषणा

    Budget 2023 Updates : अर्थसंकल्पात काय स्वस्त काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा केल्या आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, सिगारेट, परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार आहे. तर टीव्ही, काही मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स, खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल्स स्वस्त होणार आहेत. 

  • सोने, चांदी महागणार

    Budget 2023 Updates  :  सोने आणि चांदीच्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सोने, चांदी महागणार आहे.

  • Budget 2023 : मोबाईल फोन स्वस्त होणार

    - TV चे सुटे  भाग स्वस्त होणार
    - TV होणार स्वस्त होणार
    - इलेक्ट्रिक कार (EV Car) स्वस्त होणार

  • महिलांसाठी मोठी घोषणा

     Budget 2023 Updates :  महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटची घोषणा. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाणार. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. 2 लाख रुपये एखादी महिला किंवा मुलीच्या नावे दोन वर्षांसाठी 7.5 टक्के व्याजदरावर गुंतवण्याची सुविधा उपलब्ध. काही प्रमाणात ही रक्कम काढण्याचीही परवानगी असेल. 

     - महिला बचत योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट
    - 2 वर्षांसाठी महिला बचत योजना जाहीर
    - महिलांसाठी नवीन बचत योजनेची घोषणा

  • अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा

    Budget 2023 Updates : "आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले असून लाखो तरुणांना कौशल्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजना 4.0 सुरू केली जाईल. या योजनेत ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंग सारख्या नवीन युगातील अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल केंद्रे विविध राज्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. युनिफाइड स्किल इंडिया प्लॅटफॉर्म लाँच करण्या येणार आहे," अशी घोषणा सीतारामन यांनी केली आहे. 

  • 100 नवीन योजना सुरु होणार
     Budget 2023 Updates :  रेल्वेसाठी 100 नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेला एक मोठी भेट दिली आहे. प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने रेल्वेला 9 पट अधिक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने रेल्वेला 2.40 लाख कोटी रुपये दिले आहेत. 

  •  PM आवास योजना बजेटमध्ये वाढ 

     Budget 2023 Updates : PM आवास योजना बजेटमध्ये वाढ करण्यात आलेय.  केंद्र सरकारच्या या योजनेतील लोकांना घर बांधण्यासाठी सबसिडी दिली जाते. त्यात आता पुन्हा एकदा सरकारने बजेट वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा अशा लोकांना होईल, ज्यांचे घर अद्याप बांधले गेले नाही किंवा ते घर बांधण्याचा विचार करत आहेत.

  • पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; अर्थमंत्र्यांची घोषणा

    Budget 2023 Updates : डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलॉकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. याशिवाय सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाईल.

  • Budget 2023: 5 G सेवेसाठी अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 100 लॅब्जची उभारणी करणार
    - ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7000 कोटींची घोषणा! 
    - सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार 
    - यापुढे आता पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र. तसेच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरु करणार 

  •  Budget 2023 Updates :  2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद - अर्थमंत्री
    - देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार
    - पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत 33 टक्क्यांनी वाढ करून ती 10 लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे.
     - हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना
    - 10 हजार कोटी शहरी पायाभूत सुविधा करण्यासाठी देणार
    - कर्मयोगी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
    - सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण केले.

  • Budget 2023 Updates : भारतीय रेल्वेसाठी केंद्र सरकारची 2.40 लाख रुपयांची तरतूद. 2013-14 पेक्षा नऊ पटींनी अधिक तरतूद केल्याची अर्थमंत्री सीतारमण यांची माहिती

  • - मुलांसाठी आर्थिक तरतूद करणार
    - 157 नर्सिंग महाविद्यालये सुरु करणार
    - लहान मुलांसाठी खास पुस्तके तयार करणार
    - मुलासांठी राष्ट्रीय डिजीटल लायब्र
    - पूर्वकडील राज्यांच्या विकासासाठी प्रयत्न
    - आदिवासी विकासासाठी विशेष भर

  • पर्यटनाला चालना देणार

    - पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना
    - पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य आणि खासगी क्षेत्रांचे सहकार्य घेणार

  • Budget 2023 Updates : अमृतकाळासाठी आमची व्हिजन तंत्रज्ञानवर आधारित ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, बळकट सार्वजनिक वित्त व्यवस्था, सक्षम वित्त व्यवस्था यावर भर असेल.  

  • Budget 2023 Updates :  अर्थसंकल्प 2023-24 चे प्राधान्यक्रम असेल. सर्वसमावेशक वाढ, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, अनलॉकिंग क्षमता, हरित वाढ, युवा आणि आर्थिक क्षेत्र : अर्थमंत्री निर्मला सीतारामण

    अमृत ​​कालसाठी आमची दृष्टी तंत्रज्ञानावर आधारित आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये सार्वजनिक वित्त आणि मजबूत आर्थिक क्षेत्र आहे. "सबका साथ, सबका प्रयास" च्या माध्यमातून ही "जनभागीदारी" साध्य करणे आवश्यक आहे.

  • अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

    Budget 2023 Updates : - शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी
    - कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवा
    - कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना
    - मत्स विकासासाठी 6००० कोटी रुपये
    - मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज योजना
     - अन्न साठवण विकेंद्रीकरण केंद्र

  • बाजरीचे उत्पादन वाढवणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा

    Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात बाजरीचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.

  • Budget 2023 Updates :  गरीबांना 2024  पर्यत मोफत धान्य देणार. तसेच लाभार्थींच्या खात्यात थेट मदत देण्यात येणार आहे. सर्वांगीन विकासाचं स्वप्न पूर्ण केलं - अर्थमंत्री

  • Budget 2023 Updates : हरित विकासासाठी खास प्रयत्न करणार तसेच पर्यावरण पूरक अर्थसंकल्पात विशेष भर

  • Budget 2023 Updates :जगात मंदी असूनही, 7% जीडीपी वाढीचा अंदाज आहे: अर्थमंत्री  निर्मला सीतारामण

     

  • भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर - निर्मला सीतारमण

    Budget 2023 Updates : भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला आहे. भारत जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीतून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

  • Budget 2023 Updates : भारत एक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था. देशात कोणीही उपाशी पोटी राहणार नाही हे मोदी सरकारचं लक्ष्य - निर्मला सितारामण

  • कोरोना काळात कोणी उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली - निर्मला सीतारमण

    Budget 2023 Updates : "भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली," असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

  • Budget 2023 Updates : भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे - अर्थमंत्री 

  • Budget 2023 Updates : भारताची डिजीटल ताकद जगाने ओळखली आहे.

  • Budget 2023 Updates :  जगाच्या दृष्टीने आपली अर्थव्यवस्था मजबूत - अर्थमंत्री निर्माल सितारामण

  • Budget 2023 Updates : संसदेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरु. निवडणुकीआधी मतदारांना खूश करण्याची संधी सीतारमण साधणार की आर्थिक शिस्त पाळणार? 

  • Budget 2023 Updates : अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) सादर होण्याआधी सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ. जानेवारीतील जीएसटी कमाई 1 लाख 55 हजार कोटींच्या वर

  • हा भाजपचा नाही तर जनतेचा अर्थसंकल्प - संजय राऊत

    Budget 2023 Updates : "अर्थसंसकल्पात केंद्र सरकारनं मुंबईच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायला हवी. पंतप्रधान मुंबईत अलीकडे वारंवार येऊन महाविकास आघाडीच्या कामांची उद्घाटनं करतात. त्यामुळे नुसतं राजकारणासाठी मुंबईत येऊ नका. मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. केंद्राच्या तिजोरीत मुंबईकडून मोठा वाटा जातो. तसेच मुंबईचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. दुसरीकडे देश लुटला जातोय त्यात मुंबईचाही पैसा आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा अर्थसंकल्प भाजपचा नसून जनतेचा आहे," असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

  • Budget 2023 Updates : अर्थसंकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली. थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सादर करतील.

  • Budget 2023 Updates :  अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणा होण्याची शक्यता.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - टॅक्स स्लॅबमध्ये बदल, करमूक्त उत्पन्न 5 लाखांवर?
    - गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
    - कृषी क्षेत्रासाठी 2 लाख कोटींची घोषणा?
    - पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ?
    - मनरेगासाठी मिळणा-या रकमेतही वाढ?
    - स्मार्ट फोन स्वस्त होणार?
    - सीमेवर चीनसोबत तणाव, संरक्षण बजेटमध्ये 10% वाढ?
    - वंदे भारत ट्रेन्ससाठी 1800 कोटी रुपयांची घोषणा?
    - बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठी घोषणा?

  • हा भाजपचा नाही तर जनतेचा अर्थसंकल्प - संजय राऊत

    Budget 2023 Updates : केंद्र सरकारनं मुंबईच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायला हवी. पंतप्रधान मुंबईत अलीकडे वारंवार येत आहेत. महाविकास आघाडीच्या कामांची उद्घाटनं पंतप्रधान मोदी करत आहेत. त्यामुळे नुसतं राजकारणासाठी मुंबईत येऊ नका. मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. केंद्राच्या तिजोरीत मोठा वाटा मुंबईकडून जातो. पण मुंबईचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. अशातच देश लुटला जातोय त्यात मुंबईचाही पैसा आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या गेल्याने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. तसेच हे बजेट भाजपचे नसून जनतेचे आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय

  •  Budget 2023 Updates :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे संसदेत आगमन. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली असून त्यानंतर अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत #UnionBudget2023 सादर करतील.

  • अर्थसंकल्पाचे पडसाद शेअर बाजारावर 

    Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थसंकल्पाचे पडसाद शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये 378 आणि निफ्टीच्या निर्देशांकात 111 पॉईंट्सची वाढ झाली आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस विशेष आहे. कारण महिला राष्ट्रपतीच्या सहीचा अर्थसंकल्प महिला अर्थमंत्री सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण होणार आहे.

  • Budget 2023 Updates  : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामण, राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2023-24चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

  • डाळी आणि कडधान्यांचे भाव शंभरीपार 

    Budget 2023 Updates :सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. सर्वच डाळी आणि कडधान्यांचे भाव शंभरीपार गेलेत. होळीपर्यंत हे भाव चढेच राहतील असा अंदाज घाऊक व्यापा-यांनी व्यक्त केलाय... होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन यायला सुरुवात झाल्यास हे दर कमी होतील अशी आशा आहे.. सध्या बाजारात डाळी आणि कडधान्यांची टंचाई आहे. आयात होणाऱ्या डाळींचं प्रमाणही घटले आहे. त्यामुळे डाळी आणि कडधान्ये महागलेत. 

  • बजेट पूर्वीच विमान प्रवाशांना मोठा झटका 

    Budget 2023 Updates : बजेट पूर्वीच विमान प्रवाशांना मोठा झटका बसलाय.. IOCकडून विमानाच्या इंधनाच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आलीये. इंडियन ऑयल कॉरपोरेशननं आज सकाळीच नवे दर जाहीर केले असून आजपासूनच नवे दर लागू करण्यात आलेत.. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.. 

  • Budget 2023 Live Updates : आगामी लोकसभा निवडणुकांआधीचं मोदी सरकारचं हे अखेरचं बजेट असेल. तेव्हा या बजेटवर लोकसभा निवडणुकीची छाप असेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - सकाळी 9.25 वाजता - केंद्रीय अर्थमंत्री राष्ट्रपतींची मंजुरी घेणार

    - सकाळी 10 वाजता - केंद्रीय अर्थमंत्री संसदेत दाखल होतील

    - सकाळी 10.10 वाजता - केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेणार

    - सकाळी 11 वाजता - संसदेत बजेट सादर करणार

    - दुपारी 3 वाजता - केंद्रीय अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद

  • Budget 2023 Updates  : आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच2023-2024 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्याचवेळी वाढती महागाईचीही चिंता आहे. त्यामुळे महागाई रोखण्यासाठी बजेटमध्ये काय आहे, याची उत्सुकता आहे.

  • Budget 2023 Updates : अर्थमंत्री सीतारामण आज केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करणार आहेत; 2.0 मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

  •  Budget 2023 Updates : राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. अर्थमंत्री नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करतील.

  • Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प ( Budget 2023) सादर करतील. या अर्थसंकल्पात महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कोरोना संकटावर मात करुन मांडण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांपासून ते नोकरदार वर्गांकडून अनेक अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या 10 मोठ्या अपेक्षा काय आहे, ते जाणून घ्या.

  • आयकर स्लॅबमध्ये काही बदल होण्याची शक्यता

    Budget 2023 Updates : अर्थसंकल्पात 2023-24 मध्ये पगारदारांसाठी आयकर स्लॅबमध्ये (Income Tax) काही बदल होण्याची शक्यता आहे आणि ग्रामीण नोकऱ्यांसारख्या योजनांद्वारे गरीबांना काही प्रोत्साहन मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या अंतिम पूर्ण वर्षाच्या खर्चाच्या योजनेत स्थानिक उत्पादनासाठी सवलती वाढवण्याचा प्रयत्न करतील.  

  • लोकसभेत आज अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण 

    Union Budget 2023 Updates : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचा चौथा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहे. गेलं वर्षभर सातत्यानं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातून त्यांच्या खिशावर पडलेला भार काहीसा हलका होईल अशी अपेक्षा आहे. पण सीतारमण यांच्यापुढे कोव्हिड काळात बिघडलेली अर्थव्यवस्थेची शिस्त पुन्हा रुळावर आणण्याचं आव्हान आवासून उभं आहे. जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान भारताच्या शिरपेचात आलेला असला, तरी हा क्रमांक वर जायचा असेल तर आर्थिक शिस्त पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही शिस्त पाळायची असेल, तर जनेतला आवडणाऱ्या आणखी तिजोरीवर भार टाकणाऱ्या घोषणा करणे अर्थमंत्र्यांना परवडणारे नाही. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीला जेमतेम सव्वा वर्ष उरलेलं असताना सादर होणाऱ्या आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण मतदारांना खूश करतात की आर्थिक शिस्तीचा मार्ग चोखाळतात याकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहे. सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण सुरु होईल. आणि या भाषणाचं भाषणाआधी आणि भाषणानंतरच  विश्लेषण आज सकाळी 10 वाजल्यापासून फक्त 'झी 24 तास'वर बघू शकणार आहात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link