Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी `नावडता महाराष्ट्र` ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका
Budget 2024 Nirmala Sitharaman Speech Live Updates: सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं आहे? काय महाग झालं? काय स्वस्त? यासंदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
Budget Announcement 2024 in Marathi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठल्या. सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळलं या संदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
Latest Updates
पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा?
पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे ! अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.राज्यातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदनाच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय
ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार
5 एप्रिल 2024 पासून ही योजना लागू
राज्यात एकुण 75 हजार 568 आशा स्वयंसेवीका कार्यरतविकासाचा दर मागायच्या दरापेक्षा जास्त - देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला.
मोदी जी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामन यांनी संतुलित अर्थ संकल्प सादर केला
भारताच्या अर्थ व्यवस्थेने 8.2 टक्क्यांनी वाढ दाखवला आहे. भारताच्या तकतीची वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे
अन्न, वस्त्र, निवारा देण्याचं काम - एकनाथ शिंदे
नवरत्न अर्थसंकल्प - एकनाथ शिंदे
भाजप, महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? - आदित्य ठाकरे
भाजपला त्यांचं सरकार वाचवायचं आहे, म्हणून बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पातून वाटा देण्यात आलाय
पण महाराष्ट्राचा काय दोष? आपण सर्वात मोठे करदाते आहोत? आम्ही जे योगदान दिले त्याविरुद्ध आम्हाला काय मिळाले?
अर्थसंकल्पात एकदाही महाराष्ट्राचा उल्लेख होता का?
भाजप, महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते?
असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
मिंधे राजवटीचा भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट सुरू आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प
आर्थिक विकासाला गती मिळणार
समाजाला शक्ती देणारं बजेट
तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा निर्मला सीतारमण यांना सवाल
'टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र, तरतूद मात्र बिहार, आंध्राला'
'महिला आणि तरुणांसाठी हे ड्रिम बजेट'
महिला आणि तरुणांसाठी हे ड्रिम बजेट असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिज्जू यांनी म्हटलं आहे.
7000 कोटींचा फटका! नव्या इन्कम टॅक्स स्लॅबचा परिणाम
नव्या कररचनेमुळे सरकारला 37000 कोटींचा फटका बसणार असून त्याचवेळी 30 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे सरकारला बसणारा एकूण फटका 7000 कोटींचा आहे असं अर्थमंत्र्यांनी नव्या कररचनेची घोषणा केल्यानंतर स्पष्ट केलं.
बजेट 2024 मजबूत कमी मजबूर जास्त! गरीब, मध्यम वर्गाला दिलासा; गुंतवणूकदार नाराज
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं वाचन पूर्ण केल्यानंतर शेअर बाजाराकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स एक हजार अंशांनी घसरला; निफ्टी 240 अंकांनी गडगडला आहे.
नवीन करप्रणालीमध्ये बदल; अर्थमंत्र्यांची घोषणा
नव्या कर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली असून यामुळे 17500 रुपयांचा फायदा होणार आहे.
0 ते 3 लाख उत्पन्न - 0% कर
3 ते 7 लाख उत्पन्न - 5% कर
7 ते 10 लाख उत्पन्न - 10% कर
10 ते 12 लाख उत्पन्न - 15% कर
12 ते 15 लाख उत्पन्न - 20% कर
15 लाखांहून अधिक उत्पन्न - 30% कर
यामुळे करदात्यांचे 17500 रुपये वाचणार.
टीडीएससंदर्भात मोठा दिलासा
विलंबाने टीडीएस भरणे यापुढे गुन्हा नाही. आयकर कायदा 1961 ची पुढील सहा महिन्यात समीक्षा होणार. आयकर परतावा भरणं अधिक सुलभ होणार, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
काय स्वस्त काय महाग?
इंपोर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार, इलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार, एक्स रे मशीन स्वस्त होणार तर प्लास्टिकच्या वस्तू महागणार
मोबाईल फोन्स आणि चार्जर स्वस्त होणार : अर्थमंत्री
कॅन्सरच्या 3 औषधांवरील कर रद्द
कॅन्सरवरील 3 औषधांना कस्टम ड्यूटीमधून वगळण्यात आल्याची अर्थमंत्र्यांकडून घोषणा; कररचना अधिक सुलभ करण्यावर भर
देशाच्या उत्पन्नात वाढ झाली. वित्तीय तूट 4.9 टक्क्यांवर : अर्थमंत्री
शेतीसाठी 1.52 लाख कोटींची घोषणा
शेती आणि कृषीसंदर्भातील श्रेत्रांसाठी केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतारमण यांनी 1.52 लाख कोटींची घोषणा केली.
शेअर बाजार घसरला
अर्थमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच शेअर बाजार घसरला, निफ्टीमध्ये 50 अंकांची घसरण
आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी
आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून 15 हजार कोटींची मदत जाहीर; अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा
25 हजार गावं पक्क्या रस्त्यांनी जोडणार; मोदी सरकारचा संकल्प
25 हजार गावं पक्क्या रस्त्यांनी जोडणार, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा देशभरात राबवला जाणार; मोदी सरकारचा संकल्प
बिहारमधील पूरनियंत्रणासाठी 11500 कोटींची घोषणा
पीएम सौर्यघर मुफ्त बिलजी योजना
1 कोटी घरांवर 'पीएम सौर्यघर मुफ्त बिलजी योजने'अंतर्गत सोलार पॅनल लावून देणार, या माध्यमातून 300 युनीट वीज मोफत मिळणार : निर्मला सीतारामण
बिहारच्या पायाभूत सुविधांसाठी 26 हजार कोटींची तरतूद : केंद्रीय अर्थमंत्री
500 मोठ्या कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशीप देणार : केंद्रीय अर्थमंत्री
इंडस्ट्रीअल पार्क, बायो सेंटर्सची घोषणा
देशात 12 नवे इंडस्ट्रीअल पार्क उभारणार. शेतीसाठी 1000 बायो सेंटर्सचीही उभारणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण
चंद्रबाबू आणि नितीशबाबूंवर मोदी सरकार प्रसन्न
बिहारला विशेष राज्याचा दर्जा नकारला त्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्याची सारवासारव करण्यासाठी बिहारसाठी घोषणांचा पाऊस पाडल्याचं चित्र अर्थसंकल्पात पाहायला मिळालं. आंध्र प्रदेशसाठीही योजनांची घोषणा करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण कर्जात सवलत
उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जाची व्यवस्था केली जाणार. त्या कर्जावर 3 टक्के सूट दिली जाणार. यासाठी विद्यार्थ्यांना ई व्हाउचर्स मिळतील : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण
विरोधकांकडून घोषणाबाजी
बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांसाठी योजनांची घोषणा करताना विरोधकांकडून विरोधात घोषणाबाजी
रस्ते बांधण्यासाठी 26 हजार कोटी खर्च करणार : सीतारामण
पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार : सीतारामण
पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार. सर्व क्षेत्रांना ही स्कीम लागू होणार. रोजगारासाठी एकूण तीन योजना जाहीर करत आहोत. नवीन नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांना लाभ मिळणार आहे. ईपीएफओ रजिस्टर झाल्यानंतर 50 हजार रुपयांचा इंसेन्टिव्ह सरकार देणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण
शेतकऱ्यांचा डिजीटल सर्वे करणार
6 कोटी शेतकऱ्यांचा डिजिटल सर्व्हे करणार. खरीप पिकांसाठी मार्गदर्शन करणार, असंही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितलं.
शेतीला चालना देण्यासाठी राज्याबरोबर समन्वय साधणार
विकसित भारताला प्रथम प्राधान्य देणार, तेल उत्पादक बियाणे आणि भाजीपाला उत्पादन वाढीसाठी मदत करणार. राज्य सरकारसोबत समन्वय साधणार : सीतारामण
1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षित करणार
पुढील 2 वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंदर्भातील प्रमाणपत्र देऊन प्रशिक्षित करणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण
महागाईचा दर 4 टक्क्यांवर स्थीर राहील : सीतारामण
भारताचा आर्थिक विकास होत आहे. तसेच पुढील काही वर्षांमध्ये हा विकास असाच निरंतर होत राहील. भारतामधील महागाईचा दर 4 टक्के असा स्थीर राहील : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण
गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 घटकांवर आमचं लक्ष : सीतारामण
4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी 2 लाख कोटींची तरतूद
4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पाच वर्षांचा पंचसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला आहे : निर्मला सीतारामण
अर्थसंकल्प 2024 : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत दाखल
विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेमध्ये दाखल झाले आहेत.
अर्थसंकल्प 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये प्रवेश केला तो क्षण
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून त्याच पार्श्वभूमीवर संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत दाखल झाले.
अर्थसंकल्प 2024 च्या प्रती संसदेत दाखल
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या प्रती संसदेच्या आवारात दाखल. या प्रती सर्व खासदारांना वाटल्या जाणार. यात अर्थसंकल्पामधील सर्व तरतूदी सविस्तरपणे नमूद केलेल्या असतात.
देशाला विकसित भारत होण्याच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प असेल : ज्योतिरादित्य शिंदे
मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत महत्त्वाचे नेते संसदेमध्ये दाखल. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्यासाठी त्याला मंजुरी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरु झाली आहे.
महागाई आणि बेरोजगारीपासून दिलासा देतील अशी अपेक्षा : ठाकरे गट
वाढती महागाई आणि बेरोजगारीसंदर्भात नीर्मला सीतारामणजी काहीतरी दिलासा देतील अशी मला अपेक्षा आहे, असं मत उद्धव ठाकरे गटाच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं आहे. हे सरकार पंतप्रधानांच्या 'मन की बात'ऐवजी 'जन की बात' ऐकेल अशी अपेक्षा असल्याचंही चतुर्वेदी म्हणाल्यात.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थमंत्रालयात पोहोचल्या
Union Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?
मुख्य अर्थसंकल्पातच रेल्वेसंदर्भातील तरतुदी असल्या तरी देशामध्ये 60 वर्षांहून अधिक काळ रेल्वेचा संपूर्ण वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. हा अर्थसंकल्प आता वेगळा न मांडता एकत्रच मांडतात. 2016 पासून वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत मोदी सरकारने बंद केली. हे असं का करण्यात आलं? मुळात रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प का मांडला जायचा? तो काय कारण सांगून बंद करण्यात आला? जाणून घ्या येथे क्लिक करुन.
एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काय असू शकतं?
> करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
> पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, मनरेगा योजनेच्या निधीत वाढ होण्याची शक्यता
> महिलांसाठी लखपती दीदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता
> सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिलं जाण्याची शक्यता
> मेड इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता
> पर्यावरण रक्षणासाठी विशेष तरतूद
> ग्रीन एनर्जी साठी विशेष प्राधान्य
> एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता...
> संरक्षण क्षेत्रासाठी भरीव निधी
महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद?
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आज 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. या अगोदर 6 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. निर्मला सितारमण यांचा हा अर्थसंकल्प सितारमण यांच्यासाठी जर ऐतिहासिक विक्रम करणारा असला तरी सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. निर्मला सितारमण यांचा मोदी 3 मधील पहिला अर्थसंकल्प हा मोदी 3 चा रोडमॅप सांगणारा ठरणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह चार राज्यात विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळं या राज्यांवर अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यासोबतच वित्तीय तुट कमी करण्याचं आव्हान निर्मला सितारमण यांच्यावर असणार आहे.
निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय दिवसाचे वेळापत्रक-
सकाळी 8.30 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे, नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील.
सकाळी 9.00 वाजता : बजेट तयार करणा-या टीमसोबत नॉर्थ ब्लॉक येथे फोटो सेशन
सकाळी 9:10 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या टीमसह राष्ट्रपती भवनात पोहोचणार
सकाळी 9.45 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेकडे रवाना
सकाळी 10.00 वाजता : संसदेत प्रवेश करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री यांचे फोटोशूट
सकाळी 10.15 वाजता : संसदेत मंत्रिमंडळाची बैठक
सकाळी 11.00 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार
दुपारी 3.30 वाजता : अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद
सायं. 7:30 वाजता : दूरदर्शनवर मुलाखत
किती वाजता सादर होणार बजेट?
तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आज मोदींच्या तिसऱ्या टर्मचा पहिलाच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ठीक 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेमध्ये उभ्या राहतील.