Loan On Aadhaar Card : आधार कार्डवर मिळणार 5 लाखांपर्यंतचं Loan; केंद्र सरकार काय म्हणतंय ऐकाच
आधारकार्ड धारकांना मिळतंय 5 लाखांपर्यंत लोन? चला तर मग जाणून घेऊ या आहे हे प्रकरण...
Loan on Aadhaar Card : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांनासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. समाजातील सर्व घटकांचा विचार करुन त्या त्या घटकासाठी या योजना तयार केल्या जातात. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत, शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांचा यामध्ये समावेश असतो.
इतकंच नाही तर सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठीदेखील केंद्र सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात. सरकारी योजनांच्या नावाशी मिळत-जुळतं नाव वापरुन अनेकजण मात्र याचाही गैरवापर करताना दिसत आहेत.
काय आहे व्हायरल पोस्ट?
केंद्र सरकारच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Aadhaar Card असलेल्या सर्व नागरिकांना अगदी सहजपणे 4.78 लाख रुपयांचं कर्ज केंद्र सरकारकडून दिलं जाऊ शकतं.
सरकारचं काय म्हणण तेही एकदा पाहाच
सोशल मीडियावर व्हायरल पोस्टला Fact Check केल्यानंतर PIB ने स्पष्ट सांगितलं आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. सरकारकडून अशा कुठल्याही प्रकारचं loan दिलं जात नाहीये. त्याचबरोबर, PIB ने असंही सांगितलं की हा व्हायरल झालेला खोटा मेसेज कोणालाही शेअर करु नका. बनावट योजनांच्या सापळ्यात अडकून नागरिक खाजगी माहिती देतात आणि यामुळे नागरिकांच्या बँक खात्यातून रक्कम गायब करायला सोप्प होतं.
याआधीही Whatsapp च्या एका व्हयरल मेसेजमध्ये असा दावा केला होता की, प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये भत्ता दिला जातो. इतकंच नाही तर मेसेमध्ये असंही सांगितलं होतं की, योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. PIB ने जेव्हा या मेसेजचं देखील Fact Check केलं तेव्हा ही बातमी खोटी असलेल्याचं सिद्ध झालं आहे. यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याआधी त्या योजनेची पुर्णपणे माहिती घ्यावी.