Corporate Salary Job: देशात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशातील निवडणुकीच्या मुद्द्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा. राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून बेरोजगारीच्या विषयावर भाष्य करत असले तर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला किमान पोट भरता येईल इतकी कमाई असणारी नोकरी असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण भारतासारख्या देशामध्ये कमी पगारामध्ये राबवून घेण्याचे प्रकार अधिक होतात असं म्हटलं जातं. आज आपल्यापैकी अगदी उच्च पदावर असलेल्या अनेकांनाही आपल्या कॉर्परेट आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण जितकं काम करतो, जेवढं कष्ट करतो त्यापेक्षा कमी पगार दिला जातो असं वाटलं असणार. आपण अंडरपेड इम्प्लॉइ असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एका अशा नोकरीची जाहिरात व्हायरल होत आहे जी पाहून खरोखरच या नोकरीसाठी एवढा पगार दिला जात आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.


काय आहे या जाहिरातीमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल झालेल्या एका फोटोमधील जॉब प्रोफाइल आणि त्या तुलनेत देऊ केलेलं वेतन या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. बरेच जण हा एवढा पगार पाहून हैराण झाले आहेत. एका मोमो विक्रेत्याने त्याच्या दुकानाबाहेर लावलेल्या जाहिरातीवरील मजकूर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या दुकान मालकाने एका मदतनीसाची गरज असल्याचं म्हटलं आहे. बरं या मदतनीसाला एखाद्या कॉर्परेट कर्मचाऱ्या इतकी सॅलरी देण्याची तयारी मालकाने दर्शवली आहे. 'एक हेल्पर किंवा कामगार हवा आहे. पगार 25 हजार रुपये!' असा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे. आता हा पगाराचा आकडा पाहून तुम्हाला समजलं असेल की या जाहिरातीची सोशल मीडियावर एवढी चर्चा का आहे.


फोट कॅप्शनही चर्चेत


अम्रिता सिंह यांच्या पुट्टाबॉय25 नावाच्या एक्स (म्हणजेच ट्वीटर) हॅण्डलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. "हा स्थानिक मोमोजवाला देशातील कोणत्याही साधारण कॉलेमधून दिल्या जाणाऱ्या सॅलरी पॅकेज पेक्षा अधिक सॅलरी देत आहे," असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.



प्रतिक्रियांचा पाऊस


या फोटोवर युझर्सच्या ढिगाने कमेंट्स पडल्या आहेत. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात. एकाने तर मी आजच अर्ज करत आहे असं लिहिलं आहे. दुसऱ्या एकाने, माझ्या एरियातल्या प्लंबरनेही मला त्या दिवशी सांगितलं की तो महिना 50 हजारांपर्यंत कमवतो. एकाने मोमोज विक्रेत्याकडे ही नोकरी केली तर रोज एक प्लेट मोफत मोमोजही खायला मिळतील असं म्हटलं आहे.



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवरील कमेंट्स वाचून तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा.