HOW TO LOCK AADHAR CARD :  तुमचा खासगी तपशील सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI तुम्हाला असे अनेक फीचर्स देते ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकतात. तर आज जाणून घेऊया अशाच एका फीचरबद्दल. तुम्हाला माहितीये का, आधार लॉकचा वापर करून तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता आणि कधी गरज पडल्यास ते अनलॉकदेखील करू शकता. 


हे फीचर्स कसे वापरायचे?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सुरु असणाऱ्या डार्क वेब प्रकरणानंतर कोट्यवधी भारतीयांची खासगी माहिती विक्रीसाठी डार्क वेबवर  उपलब्ध असल्याचा खळबळजनक खुलासा झाला. यानंतर अमेरिकन सायबर सुरक्षा संस्थेनं प्रकरण वाढल्यावर हॅकरने फाइल्स डीलीट केल्याचा दावा केला होता. डार्क वेबवर असलेल्या या डेटामध्ये युजर्सचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, फोन नंबर आणि इतर अनेक डिटेल्स असतात. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करत असेल तर तुम्ही ते लॉक करू शकता. UIDAI आपल्या  युजर्सला त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फीचर्स देते. यापैकी एक म्हणजे आधार कार्ड लॉक करणे. 


आधार कार्ड बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे? 


आधार लॉक करण्यापूर्वी तुम्हाला 16 अंकी व्हर्च्युअल आयडी बनवावा लागेल. कारण केवळ व्हीआयडीच्या मदतीने तुम्ही आधार लॉक किंवा अनलॉक करू शकता. आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/en/ वर जावं लागेल.


व्हीआयडी जनरेट केल्यानंतर :


आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आयडी, संपूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. OTP टाकून तुम्ही तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. तुम्हाला बायोमेट्रिक्स अनलॉक कारायचे असतील, तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता. तुम्हाला फक्त आधार लॉक ऐवजी आधार अनलॉकचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा व्हीआयडी आणि कॅप्चा टाकून OTP जनरेट करावा लागेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण  करावे लागेल. 


याचा फायदा काय? 


हे फीचर्स चालू केल्यानंतर कोणीही तुमचे बायोमेट्रिक्स वापरू शकणार नाही. फक्त युजर्सच्या सुरक्षिततेसाठी हे फिचर सुरु करण्यात आलं आहे. म्हणजे, जर तुम्ही तुमचा व्हीआयडी एखाद्यासोबत शेअर केला तर तो फक्त तुमचा आधार क्रमांक वापरू शकेल. पण त्याला तुमच्या बायोमेट्रिक्समध्ये प्रवेश मिळणार नाही.