लोकसभा निवडणूक २०१९ : भाजपचं संकल्पपत्र, अनेक मोठ्या घोषणा
काम करणं कठीण असतं. पण मोदी सरकारने या काळात मोठे निर्णय़ घेतले. - अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ३ वर्षांनी २०२२ मध्ये केलेली कामं देशासमोर ठेवू
- देशातील तरुणांना योग्य संधी मिळण्यासाठी मोठं लक्ष्य घेऊन जात आहोत.
- राजकीय आणि शासकीय व्यवस्थेत जी नकारात्मकता आहे. त्या विरोधात निर्णय़ घ्यायचा आहे. सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करु.
- भ्रष्टाचारमुक्त होण्य़ाच्या दिशेने जाण्याचा संकल्प आहे.
- स्वच्छता एक जनआंदोलन झालं आणि त्यामुळे अभियान यशस्वी झालं. त्यासाठी मिडिया हाऊस आणि तरुणांचे आभार मानतो. हे कोणत्याही सरकारचं यश नाही.
- भारतात विकासाला जनआंदोलन करायचं आहे.
- २०१४ ते २०१९ मध्ये केलेल्या कामांमध्ये सामान्य माणसासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी होत्या.
- मच्छिमारांसाठी बजेटमध्ये एक वेगळ्या मंत्रालय़ाची घोषणा केली होती. पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आणि सगळ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना करु.
- वन मिशन, वन डायरेक्शनने पुढे जाऊ.
- २०२२ ला भारताला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही ७५ संकल्प घेतले आहेत. महापुरुषांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करु.
- देशवासियांचा गेल्या ५ वर्षात जो सहयोग मिळाला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो
सुषमा स्वराज
- मागील ५ वर्षात जगभरात आम्ही विश्वास मिळवला आहे.
- पाकिस्तानच्या विरोधानंतरही इस्लामिक राष्ट्रांनी भारताचं आमंत्रण रद्द केलं नाही. हे असंच होत नाही. हे मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांचं फळ आहे.
- इस्लामिक राष्ट्राच्या ओआयसी या संघटनेमध्ये भारताला प्रमुख स्थान मिळालं.
- ३२ वर्षात पहिल्यांदा सऊदी अरेबियाने भारताला प्रमुख पाहुण्य़ाचं स्थान दिलं.
- ५ वर्षात पंतप्रधान मोदींना ५ मोठे पुरस्कार मिळाले
- भारताचा प्रभाव मोदींच्या काळात खूप वाढला
- मोबाईल कंपन्या बनवणाऱ्या आधी ३ कंपन्या होत्या. आज आज १२७ कंपन्या देशात आहेत.
- आज २९ किलोमीटरचे रस्ते रोज बनत आहेत.
- आम्ही ३४ कोटी बँक खाती उघडली
- २०१४ मध्ये आम्ही जे म्हटलं ती विकास कामे करुन दाखवली
- सगळ्या पक्षांनी घोषणापत्र जाहीर केलं आहे आम्ही संकल्पपत्र घेऊन आलो आहोत
राजनाथ सिंह
- २०२० पर्यंत स्वच्छ गंगा संकल्प पूर्ण करु - राजनाथ सिंह
- प्रत्येक व्यक्तिला ५ किलोमीटरमध्ये बँकिंग सेवा पुरवण्य़ाचा संकल्प - राजनाथ सिंह
- कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करु - राजनाथ सिंह
- मेडिकल कॉलेज वाढवण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
- २०२० पर्यंत सर्व रेल्वे पटरींचं विद्युतीकरण करण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
- प्रत्येक घरात शौचालय ९८ टक्के पर्यंत पूर्ण केला आहे - राजनाथ सिंह
- प्रत्येकाला घर आणि एलपीजी गॅस आणि प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
- इंजिनियरिंग कॉलेज वाढवू आणि लॉ कॉलेजच्या जागा वाढवू - राजनाथ सिंह
- सिस्टममध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. लाभ आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. यामुळे मोठा फायदा झाला - राजनाथ सिंह
- निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी देशातील लोकांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ - राजनाथ सिंह
- प्रत्येकाच्या विकासाठी संकल्प घेतला आहे - राजनाथ सिंह
- देशातील छोट्या दुकानदारांदेखील पेन्शन दिली जाणार - राजनाथ सिंह
- ट्रेडर्स आणि व्यवसायिकांसाठी राष्ट्रीय व्यापारी आयोग बनवणार - राजनाथ सिंह
- शेतकऱ्यांना ६० वर्षानंतर पेन्शन लागू करु - राजनाथ सिंह
- प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ मिळेल - राजनाथ सिंह
- सर्व शक्यता तपासून लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधू - राजनाथ सिंह
- देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही - राजनाथ सिंह
- भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही हवे ते सगळे प्रयत्न करु - राजनाथ सिंह
- सुरक्षेच्या बाबतीत आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. - राजनाथ सिंह
- देशातील जनतेमध्ये मोदींबद्दल विश्वास वाढला आहे - राजनाथ सिंह
- जगभरातील टॉप ३ देशांमध्ये येणाचा आमचा संकल्प आहे - राजनाथ सिंह
- आम्ही नव्या भारताचं निर्माण करत आहोत. - राजनाथ सिंह
- आम्ही १३० कोटी जनतेसाठी हे व्हिजन पत्र समोर ठेवत आहोत - राजनाथ सिंह
अमित शहा
- मोदींच्या नेतृत्वात जगभरात देशाचा सन्मान वाढवू - अमित शहा
- आम्ही एक मजबूत आणि निर्णायक सरकार देऊ - अमित शहा
- काम करणं कठीण असतं. पण मोदी सरकारने या काळात मोठे निर्णय़ घेतले. - अमित शहा
- ७० वर्षानंतर भारत आज एक महासत्ता झाला आहे. - अमित शहा
- मोदी सरकार एक पारदर्शी सरकार होती. भारत आज जगात महाशक्ती बनली आहे - अमित शहा
- मागील ५ वर्षात एकही भ्रष्टाचार झाला नाही- अमित शहा
- मोदी सरकारच्या काळात जगात सन्मान वाढला - अमित शहा
- ४८ पानांचं भाजपचं संकल्पपत्र