राहुल गांधींना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस, भाषणातील अतिउत्साहीपणा नडला
राहुल गांधींना पुन्हा भाषणातला अतिउत्साहीपणा नडला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या काळात राहुल गांधी हे आपल्या वक्तव्याने वादात येत आहेत. 'चौकीदार चोर है' या वक्तव्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली होती. 'मोदी' या आडनावा बद्दल वक्तव्य करुनही ते वादात आले होते. यावेळी राहुल गांधींना पुन्हा भाषणातला अतिउत्साहीपणा नडला आहे. आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा मोदींनी केल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही नोटीस काँग्रेस अध्यक्षांना पाठवली. मध्यप्रदेशच्या शहडोल मध्ये 23 एप्रिलला झालेल्या प्रचारसभेत राहुल यांनी आदीवासी कायद्या संदर्भात वक्तव्य केले होते. राहुल यांनी आचार संहिता भाग (1) अनुच्छेद (2) नुसार आदर्श आचार संहिता उल्लंघन झाले आहे.
निवडणूक आयोगाने राहुल यांच्याकडे 48 तासांत यासंदर्भात उत्तर मागितले आहे. या वेळेत जर उत्तर मिळाले नाही तर निवडणूक आयोग राहुल यांच्यावर कारवाई करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते ओम पाठक आणि नीरज यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंर मध्य प्रदेशच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला.
आता नरेंद्र मोदी यांनी एक कायदा बनवला आहे. आदीवासींसाठी एक नवा कायदा आहे. यामध्ये आता त्यांच्यावर हल्ले केले जातील. तुमची जमिन घेतली जाईल. तुमचे जंगल घेतले जाईल. तुमच्याकडून पाणी हिसकावून घेतले जाईल अशा प्रकारचे वक्तव्य राहुल यांनी केले होते.