सुलतानपूर (उ.प्र) : मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल केंद्रीय मंत्री मनेका गांधी या अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांत त्यांना याचे उत्तर आयोगाला द्यावे लागणार आहे. मुस्लिमांना मतदानानंतर माझी गरज लागेल. म्हणून माझ्या बाजूने मतदान करा' असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसला मनेका यांनी उत्तर दिले आहे. माझे वक्तव्य तोडमोड करून दाखवल्याचे त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मनेका गांधी यांचा हा वादगस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनेका यांनी मुस्लिमांना मैत्रीचा हात दिला. त्या म्हणाल्या, परतून काही मिळत नसेल, तर नेहमीच देणारा देऊ शकत नाही. मी निवडणूक जिंकणार आहे, पण मुस्लिमांशिवाय विजय बरा वाटणार नाही. मुस्लिम कामासाठी माझ्याकडे आले, तर मी विचार करेन की यांची कामे करून काय फरक पडणार आहे? परतून काहीही न मिळता देत राहायला आम्ही काही महात्मा गांधींची मुलं नाही. मी तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करत आहे. माझ्या कामगिरीविषयी आपण पिलभित मतदारसंघात विचारु शकता. मी तेथून निवडणूक जिंकली आहे. बाकी तुमच्या हातात आहे. 



उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे.


उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. आता २०१९ च्या निवडणुकीत एक एक जागा महत्वाची होत असल्याने प्रत्येक समाजाला हाक दिली जात आहे. पहिल्यांदा बसपा प्रमुख मायावती यांनी थेट मुस्लिमांकडे मते मागितल्यानंतर आता त्यामध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची भर पडली आहे. मी खासदार होणारच आहे, मुस्लिमांनो मते मला द्या नाहीतर माझ्याकडे कामासाठी येऊ नका, असा अप्रत्यक्ष इशाराच मनेका यांनी दिला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.