नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संबंधित अनेक मेम्स सोशल मीडियात पाहायला मिळतात. पंतप्रधानांचा चाहता वर्गही मोठा असून यातील अनेकजण पंतप्रधानांचे फोटो, व्हिडीओ, एखादे गाणे सोशल मीडियात शेअर करत असतात. अशापैकी एका चिमुरड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसतोय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गली बॉय सिनेमातील अपना टाईम आयेगा हे रॅप खूप व्हायरल झाले. या गाण्यावर आधारीत चिमुरड्याने गायलेले गाणे सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहे. अपना टाईम आयेगा याऐवजी 'फिर से मोदी आयेगा' असे रॅप गायले आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1.2 लाखाहून अधिक लोकांनी पाहीला आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर करत हा मुलगा कोण आहे हे शोधा असे आवाहन केले.



देशात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून चार टप्प्यातील मतदान झाले असून आणखी तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. 6 मेला पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 19 मेला अतिंम टप्प्यातील मतदानानंतर 23 मे ला निकाल जाहीर होणार आहेत.