नवादा : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह आहे. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. पण एक बुथ असं आहे. जेथे मतदान करण्यासाठी अजून एकही मतदार आलेला नाही. बिहारच्या नवादा लोकसभा मतदारसंघात काही वादाच्या घटना घडल्याचं कळतं आहे. पण बुथ २९ वर मतदारांनी बहिष्कार टाकला आहे. एकही व्यक्ती या बुथवर मतदान करण्यासाठी पोहोचलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवादा लोकसभा मतदारसंघात बजवारा गावातील बुथ 29 वर सकाळपासून एकही मत पडलेलं नाही. या गावातील लोकांनी म्हटलं की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, रोड नाही तर वोट नाही. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.


रस्ता बनवण्याची मागणी स्थानिक खासदार, कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. पण कोणत्याच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कोणतीही तत्परता दाखवली नाही. त्यामुळे गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.


जर लोकप्रतिनिधी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत. तर मत कोणाला द्यावं. आताच्या आणि आधीच्या सरकारने देखील येथे लक्ष दिलं नाही.


नवादाच्या बुथ 29 वर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, या गावात 1163 मतदार आहेत. पण सकाळपासून कोणाची मतदानाला आलेलं नाही. मतदान करणार नसल्याचं गावकरी म्हणत आहेत. निवडणूक आयोग लोकांनी मतदान करावं म्हणून प्रयत्न करत आहे. पण लोकांची कामं होत नाही आणि ते मतदानावर बहिष्कार टाकतात तर हा लोकशाहीचा पराभव आहे.