नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात सध्या राजकीय प्रचाराचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक उमेदवार जनतेत जाऊन त्यांना मतदारांना आपल्या पक्षाला मत देण्याचे आवाहन करत आहेत. जाहीर सभांमध्ये विरोधी पक्षांचे वाभाडे काढले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराचा शेवटच्या मतदारा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. अनेक उमेदवार पदयात्रा करत गावागावात फिरत आहेत. केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या भाजपा उमेदवार प्रचारा दरम्यान एका फिरत असताना एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. गावातील गहूच्या शेतात आग लागली आणि स्मृती इराणी फायर ब्रिगेडरच्या रुपात दिसल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 स्मृती इराणी सध्या अमेठीत निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्या प्रचार करत असताना अमेठीतील मुंशीगंजच्या पश्चिम दुआरा गावात आग लागण्याची बातमी त्यांना कळाली. आणि प्रचार अर्ध्यावर सोडून स्मृती इराणी या दुआरा गावाच्या दिशेने निघाल्या. त्यांनी तिथे जाऊन केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही तर आग विजवण्यास मदतही करु लागल्या. जवळच्या बोअरिंगमधून लोक पाणी काढून आग विजवत होते. स्मृती इराणी त्यांना मदत करु लागल्या. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत स्मृती इराणी हॅंडपंपने पाणी भरताना दिसत आहेत. तसेच आग विजवणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करतानाही त्या दिसल्या. गेल्यावेळेसही स्मृती इराणी यांनी अमेठीतून निवडणूक लढवली होती. त्या राहुल गांधींकडून हरल्या होत्या. यावेळेस त्या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 



उत्तर प्रदेशच्या अमेठीत पाचव्या टप्प्यात 6 मेला निवडणूक होणार आहे. काँग्रेस परिवाराचा हा गड मानला जातो. या जागेवर काँग्रेस सरकारच्या बाजुने निकाल येत असतो.