नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 72 लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरूवात झाली आहे. भारतीयांसाठी हा लोकशाहीचा उत्सव आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये काही असे पाकिस्तानी आहेत जे भारतात कित्येक वर्षांपासून राहतात. 1000 जणांनी पाकिस्तानातून पळून भारतात शरणागती घेतली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. यावेळेस पहिल्यांदाच त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1991 मध्ये पाकिस्तानातून 1000 जण पाकिस्तानातून भारतात आलो पण मतदान करण्यासाठी 18 वर्षांचा काळ लोटल्याचे रेवाराम भील यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. रेवाराम हे पाकिस्तानच्या टांडो सुमरो येथे राहणारे होते. चौथ्या टप्प्यात राजस्थानच्या एकूण 25 लोकसभा जागांमधील 13 जागांवर मतदान सुरू आहे. भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या गोवर्धन भील यांनी देखील आज पहिल्यांदाच मतदान केले. 
 
गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पाकिस्तानातून आलेल्या हिंदुना नागरिकत्व देण्यात यावे असे अधिकार 2016 मध्ये भारत सरकारने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला दिले. केवळ पाकिस्तानीच नव्हे तर बांगलादेश, अफगाणिस्तानातून देखील हिंदू परिवार भारतात येऊन राहत आहेत. जोधपूर डीएम कार्यालयच्या माहितीनुसार 3 हजार 90 जणांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. यातील एक हजार जणांना नागरिकत्व देण्यात आले. 



ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये बिहारच्या 5, जम्मू काश्मीरची 1, झारखंड 3, मध्य प्रदेश 6, महाराष्ट्रात 17, ओडीसात 6, राजस्थान 13, उत्तर प्रदेश 12 आणि पश्चिम बंगालमध्ये 8 जागा आहेत. लोकसभेच्या 71 जागांसाठी एकूण 943 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.