Lok Sabha Election: 2024च्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला देशात लोकसभेचे निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. यावेळी 96 कोटी मतदार असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये 20 ते 29 वयोगटात 19.74 कोटी मतदार असल्याचे सांगण्यात आले. तसेच निवडणूकीत उभे राहिलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीनवेळा न्यूज पेपरमध्ये माहिती द्यावी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक कालावधीत किंवा मतदानावेळी कोणी मोफत वस्तू वाटत असेल तर आम्हाला कळवा. संबंधितांवर 100 मिनिटात कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच निवडणुकीवेळी हिंसा होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.


'निवडणुकीत मुलांचा वापर नको'


निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केला जाऊ नये यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये, त्यांना वाहनांमध्ये बसवू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राजकीय पक्षांकडून मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटप करण्यास, घोषणाबाजी करण्याचे काम देता येणार नाही.


लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने, निवडणूक आयोगाने सांगितला जबरदस्त प्लॅन


निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते.


निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपणे 


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आम्ही निवडणूक आयोगामधील सर्व अधिकारी या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत. त्यामुळे भारतीयांनीही मोठ्या संख्येनं या निवडणुकीच्या मतदानामध्ये सहभागी होऊन आपल्या बोटांना शाई लावून घ्यावी असं आवाहन केलं आहे. 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी निवडणुका पार पाडणं ही आमची जबाबदारी आहे. या निवडणुका लोकशाही मार्गाने पार पडाव्यात यासाठी पोषक वातावरण देण्याची आमची जबाबदारी आहे, असं राजीव कुमार म्हणाले. देशभरातील 800 हून अधिक जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा केली आहे, असंही राजीव कुमार म्हणाले आहेत. निवडणुका पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्षपणे होतील असं आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिलं.