Election results 2019 : अमोल कोल्हे यांच्या शिरपेचात विजयाचा तुरा
जाणून घ्या काय आणि कसं असेल सेलिब्रिटी उमेदवारांचं भविष्य....
मुंबई : Election results 2019, Lok sabha Election results 2019, lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकीचा loksabha election 2019 रणसंग्राम गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चेत असणाऱ्या आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकांमध्ये काही तुल्यबळ लढतीही पाहायला मिळाल्या. मग ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या गोपाळ शेट्टी यांना 'रंगीला गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी दिलेलं आव्हान असो, किंवा गुरदासपूरच्या मतदार संघातून अभिनेता सनी देओलने निवडणुकीच्या रिंगणात उतरणं असो. इतकच नव्हे तर, 'स्वराज्यरक्षक संभाजी...' फेम अमोल कोल्हेची शिरुर मतदार संघातील राजकीय खेळीही कितपत यशस्वी ठरते यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल. तर, उत्तर प्रदेशातील रणसंग्रामात आझम खान आणि जया प्रदा यांच्यातील लढतही सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
जया प्रदा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आझम खान यांनी त्यांच्यावर केलेल्या टीका आणि त्यानंतर आक्षेपार्ह वक्तव्यावरुन रंगलेलं विरोधाचं राजकारण, पाहता मताधिक्य मिळवण्यात यशस्वी कोण ठरणार हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. जया प्रदा आणि आझम खान यांच्या लढतीशिवाय उत्तर मुंबई मतदार संघावरही अनेकांचं लक्ष असणार आहे. कारण या मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. उर्मिला मातोंडकर यांना पदार्पणाच्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण, राजकारणात यापुढेही सक्रिय राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिरुर मतदार संघात शिवाजीराव आढळराव यांना पराभवाचा धक्का लागला. अभिनय विश्व आणि राजकारण यात समतोल राखणाऱ्या आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी पक्षात गेलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना पराभूत केलं.
*गुरदासपूर येथून अभिनेता आणि भाजपा उमेदवार सनी देओल यांच्या वाट्याला विजय आला आहे. तर, पश्चिम बंगालणध्ये तृणमूल काँग्रेची परिस्थिती चिंताजनक असताना अभिनेत्री आणि राजकीय वर्तुळात प्रवेळ करणाऱ्या मिमी चक्रवर्ती या विजयी ठरल्या आहेत.
*गोरखपूर मतदार संघातून रवी किशन विजयी उमेदवार ठरले आहेत. हा खरेपणाचा विजय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
*मथुरेत भाजपच्या हेमा मालिनी यांच्याकडे आघाडी
*रडीच्या डावात काहीच रस नाही, मोठ्या फरकाने पिछाडीवर असणाऱ्या आणि पराभवाचा एका अर्थी स्वीकार करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया
*लखनऊ मतदार संघातून राजनथ सिंह आघाडीवर
*शिवाजीराव आढळराव यांना अमोल कोल्हेंनी पराभूत केलं आहे.
*शिरुर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरपेचात विजयाचा तुरा खोवला गेला आहे.
*शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांना त्यांच्या मतदार संघांमध्ये पिछाडी.
*उत्तर प्रदेशच्या आझमगढ मतदार संघातून अखिलश यादव यांच्याकडे आघाडी, अबिनेता निरहुआ पिछाडीवर
*पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदार संघातून बाबूल सुप्रियो आघाडीवर आहेत. तर, जादवपूर येथून तृणमूलच्या मिमी चक्रवर्ती यांनी आघाडी घेतली आहे.
*आपचे भगवंत मान पंजाबच्या संगरुर मतदार संघातून आघाडीवर.
*शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे १९ हजार ७५७ मतांनी आघाडीवर
*पटना साहिब मतदार संघातून अभिनेते आणि काँग्रेस उमेदवार शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर. भाजपाच्या रवी शंकर प्रसाद यांच्याकडे आघाडी.
*अमेठी मतदार संघातून स्मृती इराणी ९ हजार मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे राहुल गांधी पिछाडीवर
*शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याकडे ४० मतांची आघाडी
*जया प्रदा पिछाडीवर, रामपूर मतदार संघातून आझम खान यांच्याकडे आघाडी
*गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओलला आघाडी
*अमोल कोल्हे १४ हजार मतांनी आघाडीवर
*शिवाजीराव आढळरावांना मागे टाकत शिरुर मतदार संघातून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर
*उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर पिछा़डीवर
*गोरखपूर मतदार संघातून रवी किशन आघाडीवर
* गोरखपूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या रवी किशन यांनी निकालाच्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने केली.