बाणेज, गुजरात : लोकसभा निडवणूक २०१९ ची घोषणा झालीय. या दरम्यान गुजरातच्या गीरच्या जंगलातून एक उल्लेखनीय घटना समोर येतेय. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य होईल की निवडणूक आयोग एका मतदाराचाही केवढा गांभीर्यानं विचार करू शकतं... गुजरातच्या जुनागढमध्ये एक मतदान केंद्र असंही आहे जिथे केवळ एक मतदार आहे. जुनागढच्या गीरच्या जंगलात बाणेज नावाची एक जागा आहे. इथल्या धार्मिक स्थळावर भरतदास बापू नावाचे साधू राहतात. निवडणूक आयोगानं त्यांच्या मतदानासाठी खास व्यवस्था केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गीरच्या जंगलाच्या मध्यभागी बाणगंगा महादेव मंदिरात भरतदास दर्शनदास गुरू हे महंत म्हणून काम करतात. ते या भागातील एकमेक मतदार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते इथंच राहतात. सर्व बाजुंनी म्हटलं तरी या भागाच्या आसपास ३० किलोमीटरपर्यंत कोणतंही गाव किंवा शहर नाही. उल्लेखनीय म्हणजे, गीरच्या जंगलातील बाणेज नावाचा हा भाग वाघांच्या मुक्त वावरासाठी ओळखला जातो. 


 भरतदास बापू

भरतदास बापू यांच्यासाठी निवडणूक आयोगानं खास व्यवस्था केलीय. जुनागढचे आयुक्त डॉ. सौरभ पारधी यांनी याबद्दल माहिती दिली. 


गुजरातच्या वनविभागाद्वारे गीरच्या जंगलात बाणेर मंदिराजवळ एक खास मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. हे मतदान केंद्र गीर-सोमनाथ जिल्ह्यातील गीर-गड्ढा मत मतदारसंघात येतं. जंगलाच्या आत ५५ किलोमीटर अंतरावर हे मतदान केंद्र असेल. याच मतदान केंद्रावर मतदान करत महंत भरतदास बापू आपला मतदानाचा हक्क बजावतील.