Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस उजाडण्याआधीच भाजपच्या पक्ष कार्यालयांमध्ये जल्लोष पाहायला मिळत होता. त्याचत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच देशातील एका राज्यात भाजपला बिनविरोध विजय मिळाल्याचं पाहायला मिळालं. निकालांची आकडेवारी किंबहुना कल हाती येण्याआधी मिळालेला हा विजय होता गुजरातमधील सूरत मतदारसंघातील जागेसाठीचा. जिथं भाजपला बिनविरो विजय मिळाला. 


निकालांपूर्वीच कसा मिळाला बिनविरोध विजय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील सूरत इथं परिस्थितीच अशी तयार झाली, की इथं निवडणुकीचीच गरज भासली नाही आणि भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय जाहीर करण्यात आला, गुजरातच्या राजकीय इतिहासात आतापर्यंतची ही पहिलीच घटना असून, पहिल्यांदाच निवडणूक न घेता इथं उमेदवाराचा बिनविरोध विजय घोषित झाला. 


गुजरातच्या सुरत जागेसाठी भाजपच्या मुकेश दलाल यांच्यासह एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांनी निवडणुकीसाठीचा अर्जही घेतला होता. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जवळपास 9 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली तर, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज काही तांत्रिक कारणांमुळं रद्द करण्यात आला. ज्यामुळं मुकेश दलाल यांचा इथं बिनविरोध विजय झाल्याचं निष्पन्न झालं.   


हेसुद्धा वाचा : Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? पाहा लोकसभा निवडणूक निकालांचे पहिले कल एका क्लिकवर