Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 22:49 वाजता

दिल्लीत खलबतं

लोकसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीत मोठ्या हालचालींना वेग आलाय. एनडीएकडे बहुमत असलं तरी देखील इंडिया आघाडीचा सरकार स्थापनेचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक होईल. तर दुसरीकडे एनडीएची देखील उद्या दिल्लीत बैठक होऊ शकते. चंदबाबू नायडू उद्या दुपारी 2 वाजता दिल्लीत पोहोचतील तर नितीश कुमार देखील सकाळी 11 वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत.

4 Jun 2024, 19:32 वाजता

लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या आपुलकीसाठी मी जनता जनार्दन यांना प्रणाम करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही सुरूच ठेवू अशी ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

4 Jun 2024, 18:03 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: ही लढाई संविधानाच्या रक्षणासाठीच होती- राहुल गांधी 

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस नेते आणि विजयी उमेदवार राहुल गांधी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. 'मी आधीच ठरवलं होतं, त्यांनी जेव्हा आमची खाती गोठवली, पक्ष फोडले तेव्हाच मी ठरवलं होतं की, भारतातील जनतेनं संविधानासाठी एकत्र येऊन लढावं आणि मला विश्वासही होता. मी जनतेचा, इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचा, नेता आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल उचललं आहे. आम्ही आघाडीतील उमेदवारांचा आदर केला आणि जिथं लढलो, तिथं एकजुटीनं लढलो. काँग्रेसनं इंडिया आघाडीनं अतिशय स्पष्टपणे देशाला एक नवा दृष्टीकोन दिला आहे. आरक्षणांवर भाजपचं आक्रमण, गरीबीच्या आलेखात वाढ... अदानींचे शेअर तुम्ही पाहिले? जनता मोदींचा थेट संबंध अदानींशी समजत आहे.. जनतेनंच मोदींना नाकारलं आहे. आम्ही ते ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचं समर्थन करत नाही हेच जनतेनं पंतप्रधानांना दाखवून दिलं आहे आणि मला या जनतेचा प्रचंड अभिमान वाटतोय', अशी प्रक्रिया देत समाजातील प्रत्येक वर्गाच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप देत संविधानचं रक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत, आम्ही आमची सर्व आश्वासनं पूर्ण करू याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. 

4 Jun 2024, 17:52 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: लोकसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसची पत्रकार परिषद... कोण काय म्हणालं? 

बँक खाती गोठवण्यापासून नेत्यांच्या वाटेत अडथळे आणण्यात आले. पण, सुरुवातीपासूनत काँग्रेसचा प्रचार सकारात्मक वळणावर सुरु झाला. बेरोजगारी, महागाई या आणि अशा मुद्द्यांसह आम्ही जनतेसमोर आलो आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, असं मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांना समर्थन देत या यात्रांनी विजयी सरशीमध्ये मोठी भूमिका बजावल्याचं ते म्हणाले. 

4 Jun 2024, 17:45 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयात पोहोचताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेस पक्ष मुख्यालयात पोहोचताच तिथं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याच क्षणाची ही दृश्य... 

4 Jun 2024, 17:36 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  हिमाचल प्रदेशातून अनुराग ठाकूर विजयी 

हिमाचल प्रदेशातील हमीरपपूर मतदारसंघातून अनुराग ठाकूर विजयी झाले असून, काँग्रेसच्या सतपाल रायजादा यांना त्यांनी 182357 मतांनी पराभूत केलं. 

4 Jun 2024, 17:16 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  ही जनतेची लढाई होती आणि... , नाना पटोले यांची सूचक प्रतिक्रिया 

देशभरात इंडिया आघाडीला मिळालेली सरशी पाहता ही जनतेची लढाई होती आणि जनतेनं संघर्ष करत राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. देशात आता परिवर्तन सुरु झालं असून, जनतेनं हुकूमशाहीला उत्तर दिलं आहे. हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा एकाच क्लिकवर

4 Jun 2024, 16:41 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  राहुल गांधी दोन्ही मतदारसंघांतून विजयी 

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले असून, उत्तर प्रदेशातील गड त्यांनी खऱ्या अर्थानं राखला. 

4 Jun 2024, 16:25 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी 

लोकशाही निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली त्यावेळी पिछाडीवर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 152513 इतक्या मताधिक्यासह त्यांनी काँग्रेसचे अजय राय यांना पराभूत केलं. 

 

4 Jun 2024, 16:19 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन - दिग्विजय सिंह 

मध्य प्रदेशच्या राजगढ येथील काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या जागेसाठीचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.