नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारात काँग्रेसने आपण सत्तेत आलो तर गरीब परिवारांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रुपये देऊ अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. किमान मूलभूत उत्पन्न हमी योजनेनुसार गरीब परिवारांच्या बॅंक खात्यात ही रक्कम गोळा केली जाणार आहे. काँग्रेसच्या या योजनेवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत आणि योजनेतील पुढची माहीतीही दिली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही परिवारातील गृहीणीच्या खात्यात दिली जाईल असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. ही योजना महिला केंद्रीत असणार आहे. या योजनेचा ग्रामीण आणि शहरी भागांना समान लाभ मिळेल असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गरीबांच्या भल्यासाठी असलेल्या योजनेच्या बाजुने आहात की विरोधात हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे असे म्हणत सुरजेवाला यांनी भाजपाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी मोठ्या धनिकांना 3.17 लाख कोटी देऊ शकतात मग गरीबांना 72 हजार देण्याच्या विरोधात का आहेत ? असा प्रश्न सुरजेवाला यांनी उपस्थित केला. मोदी आणि भाजपा नेहमी गरीबांच्या विरोधात उभे राहीले आहेत. नरेंद्र मोदी-गरीब विरोधी असा टोला त्यांनी लगावला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आरोपांनाही सुरजेवाला यांनी प्रत्युत्तर दिले. बोगस ब्लॉग मंत्री या योजनेचा अपप्रचार करत आहेत. आम्ही सर्वांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने ही योजना आणत आहोत. यासोबत मनरेगा णि दुसऱ्या कल्याणकारी योजना देखील सुरू राहतील असेही सुरजेवाला म्हणाले.


योजनेआधीच वाद 



गेल्या पाच वर्षांमध्ये गरीबांना खूप हाल सहन करावे लागले. आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आम्ही त्यांना मूलभूत उत्पन्न हमी योजनेचा लाभ देऊ इच्छितो. या योजनेनुसार गरीब परिवाराची मासिक कमाई किमान 12 हजार रुपये असेल. आम्ही भारतातील गरीब परिवारांना वार्षिक 72 हजार रुपये त्यांच्या बॅंके खात्यात थेट देऊ असे राहुल म्हणाले होते. पण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.



या आश्वासनाची रुपरेषा काय असेल ? यासाठी किती रक्कम खर्च होणार आहे ? ती रक्कम कुठून येणार ? यावर काँग्रेसने काहीच न स्पष्ट केल्याचे जेटलींनी म्हटले. तुम्ही लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम करत असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. घोषणांचे अर्थशास्त्र इंदीराजींना चांगले समजायचे. काँग्रेस पार्टीने 7 दशके भारताला धोका दिला. 1971 मध्ये काँग्रेसने गरीबी हटाओचा नारा दिला होता. राजीव गांधी यांच्याकडे गरीबी हटवण्याची संधी देखील होती. पण काँग्रेसचे लक्ष गरीबीपेक्षा घोषणांकडेच होते. राहुल गांधी तर केवळ गरीबांची चेष्ठाच करत असतात असा आरोपही जेटली यांनी केला.