नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहीता लागू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मतदार जोडण्याच्या तयारीला लागला आहे. निवडणुकीच्या दरम्यान मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान येतोय. यावरून राजकारण करण्यास सुरूवात झाली आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रमजान वरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम समुदाय आणि रमजानचा वापर करु नका असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे. तसेच रमजान दरम्यान जरी निवडणुका असल्या तरी मुस्लिम मतदानावर त्याचा काही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लिम समाज रमजानच्या महिन्यात रोजा नक्की पाळतील. ते यावेळी सामान्य आयुष्यच जगत असतात. कामावर देखील जातत. गरीबातील गरीब व्यक्ती देखील रोजा ठेवतात असे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. किंबहुना रमजानमध्ये मतदानाची संख्या वाढलेली दिसेल. 


लोकसभा निवडणूक 11 एप्रिल सुरू होत आहे. याच दरम्यान रमजान महिना देखील आहे. रविवारी येणाऱ्या निवडणुकीवर तृणमूल कॉंग्रेस नेता आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी भाजपावर निशाणा साधला. अल्पसंख्यांकानी मतदान करावे असे भाजपावाला वाटत नाही. म्हणून रमजान असल्याची काळजी घेतली नाही. पण आम्हाला काळजी नाही. आम्ही मतदान करणार असेही ते म्हणाले. 


निवडणूक आयोग एक संविधानिक संस्था आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही त्याच्या विरोधात काही बोलू इच्छित नाही. 7 चरणात होणाऱ्या निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. या तीन राज्यात अल्पसंख्यांकांची संख्या जास्त आहे. रमजान देखील याचवेळी असल्याने मुस्लिम रोजा ठेवतील. त्यामुळे निवडणूक आयोगाला याची काळजी घ्यावी लागणार आहे.