नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणूक २०१९ साठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केलीय. एकूण १८४ नावांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याही नावाचा आणि त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत तर भाजप अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गांधीनगर हा मतदारसंघ ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा हक्काचा मतदारसंघ समजला जात होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेद्वारांच्या नावांबद्दल विचार-विनिमय करण्यात आला. या बैठकीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाहदेखील उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी यांच्यासहीत अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. 


या यादीत भाजपनं आपल्या 'लोहपुरुष' आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा पत्ता कापल्याचं स्पष्ट झालंय. ९१ वर्षीय लालकृष्ण आडवाणी १९९८ पासून गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडून येते होते. आता मात्र अमित शाह या मतदारसंघातून आपलं नशिब आजमावणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अमित शाह पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. 


 

इतकंच नाही तर दोन वेळा उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या भुवन चंद्र खंडुरी यांचंही तिकीट यंदा भाजपनं कापलंय. बी सी खंडुरी २००७-२००९ आणि २०११ ते २०१२ या दरम्यान उत्तराखंडे मुख्यमंत्री होते. या वयोवृद्ध नेत्यांना आता मात्र भाजपनं निवडणुकीतून बाजुला सारलंय.


पक्षातील आणखीन एक ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचंदेखील राजकीय भविष्य अनिश्चित मानलं जातंय. जोशी २०१४ मध्ये कानपूर मतदारसंघातून निवडणून आले होते.  


भाजपची पहिली यादी - महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं 


 


नंदूरबार (एससी) - डॉ. हिना विजयकुमार गावित


धुळे - डॉ. सुभाष रामराव भामरे


रावेर - रक्षा निखिल खडसे


अकोला - संजय शामराव धोत्रे


वर्धा - रामदास चंद्रभानजी तडस


नागपूर - नितीन जयराम गडकरी


गडचिरोली - चिमूर (एसटी) - अशोक महादेवराव नेते


चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहीर


जालना - रावसाहेब दानवे पाटील


भिवंडी - कपिल मोरेश्वर पाटील


उत्तर मुंबई - गोपाळ चिनय्या शेट्टी


उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन


अहमदनगर - सुजय विखे पाटील


बीड - प्रीतम गोपिनाथ मुंडे


लातूर (एससी) - सुधाकर भालेराव श्रृंगारे


सांगली - संजय काका रामचंद्र पाटील