मथुरा : भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार यांच्याकडे 125 कोटीहून अधिक संपत्ती आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे पती धर्मेंद्र देओल यांची संपत्ती एकत्र केली तर हा आकडा 250 कोटींवर जातो. 2014 च्या निवडणुकीत हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची संपत्ती 178 कोटी इतकी होती. लोकसभ निवडणुक 2019 साठी सोमवारी हेमा मालिनी यांनी मथुरा तहसिल कार्यालयात नामांकन अर्जासोबत संपत्ती, शपथ पत्र सादर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या सादर केलेल्या शपथ पत्रानुसार हेमा मालिनी यांच्या बॅक खात्यात जमा, नगदी आणि दागिने मिळून 13 कोटी 22 लाख 96 हजार 945 रुपये आहेत. तर पती धर्मेंद्र यांच्याकडे 12 कोटी 62 लाख 15 हजार 911 रुपये आहेत. हेमा मालिनी यांच्याकडे बिगर शेती जमिन आणि आवासीय जागेत 7 कोटी 4 लाख 15 हजार 895 रुपये आणि पती धर्मेंद्र यांच्याकडे 1 कोटी 59 लाख 80 हजार 288 रुपयांची संपत्ती आहे. 



पाच वर्षात हेमा मालिनी यांची संपत्ती दुप्पट झाल्याचे चित्र आहे. 2014 च्या निवडणुकीत हेमा मालिनीने आपली आणि पती धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 178 कोटी दाखवली होती. यामध्ये हेमा मालिनी 66 कोटी रुपयांच्या मालकीण होत्या.



आता हेमा यांच्याकडे 1 अब्ज 25 कोटी 06 लाख 87 हजार 51 रुपयांची संपत्ती आहे. पाच वर्षामध्ये हेमा मालिनी यांच्या संपत्तीत साधारण 59 कोटीची वाढ झाली आहे. दोघांच्या संपत्तीत पाच वर्षात 72 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.