मुंबई : देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे. पण भाजपसाठी खरी लढाई इथून पुढच्या तीन टप्प्यांमध्येच असल्याची चर्चा आहे. २०१४ साली भाजपनं जिंकलेल्या २८२ पैकी ११६ जागांवर पुढच्या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या बहुतांश मतदारसंघांचा पुढच्या तीन टप्प्यात समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेला या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळं लोकसभेसाठी भाजपनं या ठिकाणी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. इथून पुढच्या टप्प्यांसाठी आता कसा प्रचार रंगतो आणि कुठले नवे मुद्दे पुढं येतात, याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ७१ जागेवर मतदान झालं. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने यापैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ३, तृणमूल काँग्रेसला ६, बिजू जनता दलला ६ आणि आणखी एक जागा विरोधी पक्षाकडे गेली होती.


उत्तर प्रदेशमधील १३ पैकी १२ जागेवर भाजपने विजय मिळवला होती. मोदी लाटेत कन्नौज येथून डिंपल यादव यांचा खूप कमी फरकाच्या मताने विजय झाला होता. येथे डिंपल यादव आणि सुब्रत पाठक यांच्यात पुन्हा टक्कर आहे.


लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी ७ टप्प्यामध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मेला निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ एप्रिलला घोषित होणार आहे.