लोकसभा निवडणूक २०१९: भाजपला काँग्रेस नाही तर इतर पक्ष देणार आव्हान
२०१९ लोकसभा निवडणुकीत कोण देणार मोदींना आव्हान...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. सगळ्याच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरु केली आहे. जशीजशी निवडणूक जवळ येईल तशी रंगत आणखी वाढणार आहे. सत्तेचं केँद्र असलेल्या युपीत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सपा, बसपा, काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये येथे कांटे की टक्कर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा २०१४ सारखी सत्ता मिळवते का हे पाहावं लागणार आहे. काँग्रेसला २०१४ च्या तुलनेत किती यश मिळेल हे देखील पाहावं लागेल. जनता मोदींना पुन्हा सत्ता देत की काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवते की जनता तिसरी आघाडीच्या बाजुने कौल देते हे येणारी वेळच सांगेल.
आजतकने केलेल्या सर्व्हनुसार, उत्तर भारतात एनडीएचा दबदबा दिसत आहे. उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हनुसार, येथे एनडीएला ४० टक्के मतं मिळू शकतात. यूपीएला मात्र येथे २३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेमध्ये इतर राज्यांमधील इतर प्रादेशिक पक्ष देखील एनडीएला आव्हान देऊ शकतात. कारण इतर पक्षांना ३७ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांमुळे भाजपला फटका बसण्याची चिन्ह आहे. यामुळे भाजपला मिळणाऱ्या मतांचं विभाजन होऊ शकतं. त्यामुळे काँग्रेस पेक्षा इतर पक्ष भाजपसाठी आव्हान देणारी ठरणार आहेत.
सर्व्हनुसार एनडीएला उत्तर भारतात ६६ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. युपीएला मात्र येथे २० जागाच मिळताना दिसत आहे.
एनडीएमधील पक्ष : भारतीय जनता पक्ष, ऑल इंडिया एन रंगास्वामी काँग्रेस, अपना दल, बोडो पीपुल्स फ्रंट, डीएमडीए, जेडीयू, एलजेपी, नागा पीपल्स फ्रंट, पीएमके, नॅशनल पीपल्स पार्टी, आरपीआय(आठवले गट), शिरोमणी अकाली दल, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट, शिवसेना
यूपीएमधील पक्ष : काँग्रेस, डीएमके, जेडीएस, नॅशनल कॉन्फ्रेंस, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), आययूएमएल, एनसीपी, आरजेडी, आरएलडी, टीडीपी
अन्य पक्ष : आम आदमी पक्ष, असम गण परिषद, अन्नाद्रमुक, फॉरवर्ड ब्लॉक, तृणमूल काँग्रेस, एआययूडीएफ, बिजू जनता दल, सीपीआय, सीपीआय-एम, इंडियन नॅशनल लोकदल, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी, केरळ काँग्रेस(जोसेफ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एनएलपी, आरएसपी, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, अपक्ष, सपा-बसपा-आरएलडी आघाडी