नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्च पक्षांनी कंबर कसली असून आता सुरुवात झाली आहे ती प्रचार सभांच्या निमित्ताने सुरु असणऱ्याच्या देशव्यापी दौऱ्यांची. काँग्रेसच्या महासचि प्रियांका गांधीही सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, या माध्यमातून त्या जास्तीत जास्त जनतेच्या संपर्कात येत आहेत. गांधी यांचा हा चार दिवसीय दौऱ्यावर अनेकांचा रोषही ओढावला आहे. विरोधकांनी त्यांच्या या दौऱ्यावर, नौका प्रवासावर सडकून टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही प्रियंकांच्या या दौऱ्यावर टीका करत निवडणुका या गांधी कुटुंबासाठी एक प्रकारच्या सहलीसारख्याच असतात असं म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी प्रियंका गांधी यांनी नौकेतून प्रवास करत प्रयागराजमध्ये प्रचार केला. त्यांच्या याच प्रवासाचा उल्लेख शर्मा यांनी बोट यात्रा मे ही खोट, अशा आशयाचं वादग्रस्त वक्तव्य केलं. 



'हे आता जुनं झालं आहे. त्यांचा उल्लेख राजघराणं... म्हणूनच केला गेला पाहिजे. निवडणुका जाहीर होताच ते येतात, सहलीचा आनंद घेतात, परत जातात आणि पुन्हा पाच वर्षांनी परततात. हा नौका प्रवास वगैरे सर्वकाही मतांसाठीच केला गेला आहे', असं ते म्हणाले. यांच्या नौका प्रवासात असणाऱ्या त्रुटी आधीच त्यांना दाखवून देण्यात आल्या होत्या, हे सूचक विधानही त्यांनी केलं. 


प्रियांका गांधी आणि गांधी कुटुंबावर करण्यात आलेल्या या टीकेला आता काँग्रेसकडून नेमकं कसं आणि काय उत्तर देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकिकडे विरोधकांचा विरोध आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह अशा एकंदर वातावरणात प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचा दौरा पार पाडत आहेत. या दौऱ्यात त्यांना धर्माच्या राजकारणाचाही सामना करावा लागत आहे. काशी विश्वनाथ मंदिरात ख्रिस्तधर्मीय प्रियंका गांधी वाड्रा यांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी काही वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.