Priyanka Gandhi Speech Video : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात प्रचारसभांचीच गर्दी पाहायला मिळत आहे. देशस्तरावरील मोठे नेते महाराष्ट्रात असतानाच तिथं काँग्रेसची एक फळी प्रियंका गांधी सांभाळताना दिसत आहेत. जनमानसात जाऊन सामान्यांशी संवाद साधणाऱ्या याच प्रियंका गांधी मुरैना येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान व्यासपीठावर भावूक झाल्या आणि वडिलांच्या निधनासमयीचा तो कठीण प्रसंग आठवून त्यांनाही हुंदका दाटून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका यांचा मुरैना प्रचारसभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जिथं अवघ्या चार मिनिटांच्या त्या दृश्यांनी त्यांच्या मनातील घालमेल सर्वांसमोर आणली. घराणेशाही, वारसा या आणि अशा मुद्द्यांवरून आपल्या कुटुंबाला, आपल्या भावाला सातत्यानं लक्ष्य केलं जात असल्याबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


इंदिरा गांधी यांच्याकडून वारसा म्हणून मिळालेल्या संपत्तीसाठी राजीव गांधी यांनी वारसा हक्कसंबंधी कायदा रद्द केल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याविषयी खंत व्यक्त करताना प्रियंका भावूक झाल्या. नकळत वडिलांच्या निधनाच्या क्षणाची परिस्थिती त्यांनी पहिल्यांना जाहिरपणे मांडली. 


प्रियंका गांधी यांचं भाषण, जसंच्या तसं...


'19 व्या वर्षी ज्यावेळी मी माझ्या शहीद वडिलांचे तुकडे घरी आणले तेव्हा या देशानं माझी निशारा केली होती. मी नाराज होते कारण, मी माझ्या वडिलांना पाठवलेलं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं तुमचं काम होतं. मी विश्वासानं माझ्या वडिलांना तुझ्याकडे पाठवलं आणि तू मला त्यांचे तुकडे परत दिलेस. ते तुकडे देशाच्या तिरंग्यामध्ये होते... मी निराश होते. मी बलिदान, हौतात्म्याचा अर्थ जाणते. आज मी 52 वर्षांची आहे आणि पहिल्यांदाच मी व्यासपीठावर हे सर्व बोलली आहे.'


मी देशावर नाराज होते पण, हळुहळू माझ्या लक्षात आलं की आपण त्यांच्यावरच रुसतो ज्यांच्यावर आपण नितांत प्रेम करत असतो. या देशाप्रती माझ्याही मनात प्रचंड प्रेम आहे, असं म्हणताना प्रियंका यांच्या भावना दाटून आल्या. 


हेसुद्धा वाचा : भारतानं हेरली चीनची चाल; रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ शक्सगाम खोऱ्यात नेमकं काय सुरु होतं?


जेव्हाजेव्हा पंतप्रधान आपल्या वडिलांना देशद्रोही म्हणतात, त्यांनी कायदा बदलला असं म्हणतात तेव्हा आपल्या मनात नेमकी भावनांची कशी घालामेल होते हे सांगताना प्रियंका गांधी यांनी आपल्या वडिलांना वारसा म्हणून धन-दौलत मिळाली नसून, त्यांना वारसा म्हणून हौतात्म्य मिळालं आहे असं ठणकावून सांगितलं आणि हजारोंच्या जनसमुदायानं त्याच क्षणी घोषणा देण्यास सुरुवात केली. 



दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आपण भेट दिली असून, त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनातील भावना मी जाणते असं त्यांनी पंतप्रधांना थेट शब्दांत स्पष्ट केलं. 'मी पंतप्रधानांना इतकंच सांगायला आलेय की, आम्हाला देशद्रोही म्हणा, घरातून काढून टाका, त्यांनी माझ्या भावावर इतके खटले दाखल केले, कधी बिहार- कधी गुजरात; पण तो तिथंतिथं जाणार. तुम्ही काहीही करा, आम्हाला ठार कला पण ही बलिदानाची भावना आमच्या मनातून जाणार नाही', असं म्हणत प्रियंका गांधी यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली.