Sonia Gandhi Emotional Appeal: 'मी माझा मुलगा तुमच्या हाती सोपावतेय...' अशी भावनिक साद कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी घातली आहे. त्या  उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील जाहीर सभेत बोलत होत्या. राहुल गांधी यांच्या प्रचारात त्या स्टार प्रचारक आहेत. मी आपला मुलगा त्यांच्याकडे सोपवत आहे.  राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायबरलेली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. राहुल गांधी रायबरेली येथून निवडणूक लढवत आहेत. सोनिया गांधी यांनी रायबरेलीचे नेतृत्व केले आहे.  या वर्षाच्या सुरुवातीला त्या राज्यसभेवर गेल्या.


काय म्हणाल्या सोनिया गांधी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे. तुम्ही मला जसे आपले मानले, तसेच राहुलला आपले माना. राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत', अशी भावनिक साद त्यांनी घातली. यावेळी त्यांच्या मागे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उभे होते. 



सोनिया गांधी या 2004 मध्ये रायबरेलीमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आज त्यांनी रायबरेलीच्या जनतेला साद घातली.  "मी राहुल आणि प्रियंकाला तोच धडा शिकवला आहे जो इंदिरा गांधी आणि रायबरेलीच्या लोकांनी मला शिकवला होता. सर्वांचा आदर करणे, दुर्बलांचे रक्षण करणे, संरक्षण करणे. लोकांचे हक्क हे राहुलला शिकवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी घाबरू नका, कारण संघर्षाची मुळे खूप खोल आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडून दिल्याबद्दल सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेचे पुन्हा आभार मानले. 


'मी तुमच्यापुढे श्रद्धेने नतमस्तक'


'20 वर्षे खासदार राहणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मी मनापासून तुमची ऋणी आहे. मी तुमच्यापुढे श्रद्धेने नतमस्तक झाले आहे. तुम्ही मला नेता म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे. गंगा माईसारखे पवित्र असलेले हे नाते अवध आणि रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून सुरू झाले आणि आजही कायम असल्याचे त्या म्हणाल्या. रायबरेलीमध्ये 53 वर्षीय राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह निवडणूक लढवत आहेत.