नवी दिल्ली : लोकसभा २०१९ निवडणुकीसाठीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान संपले. सातव्या टप्प्यात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे.



यांचे भवितव्या मतदान यंत्रात बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघ नरेंद्र मोदी तर काँग्रेसकडून अजय राय आणि आघाडीकडून शालिनी यादव रिंगणात आहेत. तसेच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखवीर सिंह बादल फिरोजपूर येथून तर त्यांच्या पत्नी हरसमिरत कौर भटिंडा येथून निवडणूक रिंगणात आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रणीत कौर पटियाला येथून तर तीन वेळा खासदार राहिलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन दुमका येथून निवडणूक लढवित आहेत. पटणा साहिब येथून भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद तर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातले मतदान संपले आहे. आता २३ मे रोजीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम पाहायला मिळाला. केंद्रात पुन्हा भाजपचे सकार येणार की काँग्रेस महाआघाडीचे सरकार येणार याचीच उत्सुकता लागली आहे. थोड्याच वेळात अनेक एक्झिट पोल येणार आहेत. यात कोणाच्या बाजुने निकाल येईल याचे अंदाज व्यक्त केले जाणार आहेत. त्यामुळे याचीही उत्सुकता अनेकांना आहे.