लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यात.
नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यात.
तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय. यावरुन प्रचंड गदारोळ झाला.... त्यानंतर दोन्ही सभागृहं दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
या ठरावाला काँग्रेससह द्रमुक, तृणमूल काँग्रेस, सपाव्यतिरिक्त डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिलाय... अविस्वास ठराव आला तर शिवसेना मात्र तटस्थ राहणार आहे. तर सध्या एनडीए सरकारकडे बहुमत असल्यानं सरकारला कुठलाही धोका नसल्याचा दावा भाजपनं केलाय