Loksabha Result 2024 : देशाच्या सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजे 4 जूनला जाहीर लागणार आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत देशात कोणाची सत्ता येणार? कोण बाजी मारणार, कोणाला हार पत्करावी लागणार? याचं चित्र स्पष्ट होईल. मतमोजणीची प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमवरही (EVM) बारीक लक्ष ठेवण्यात आलंय. मतमोजणीसाठी नेत्यांचीही तयारी सुरूये. सकाळी 8 वाजता मतमोजणीला (Counting) सुरूवात होईल. देशाचे आणि महाराष्ट्राचे निकाल 'झी 24 तास'वर सर्वात आधी पाहाता येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी होते मतमोजणी?
भारतात, लोकप्रतिनिधी कायदा-1951 च्या कलम 64 नुसार, मजमोजणी संबंधित मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर (RO) च्या देखरेखीखाली किंवा निर्देशानुसार केली जाते. कोणत्याही क्षेत्रातील निवडणुका घेण्याची जबाबदारीही रिटर्निंग ऑफिसरची असते. निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर हा सहसा संबंधित जिल्ह्याचा जिल्हा दंडाधिकारी असतो. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त मतदारसंघ असल्यास, इतर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी केलं जातं. निवडणूक आयोग या सरकारी अधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार निवडतं.


निवडणूक आयोग तारीख आणि वेळ ठरवतो
मतमोजणीची तारीख आणि वेळ निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते. तर काही मतदार संघात मतदानाचं ठिकाण रिटर्निंग ऑफिसर ठरवतात. साधारणपणे कोणत्याही एका मतदारसंघातील मतमोजणी एकाच ठिकाणी होते आणि त्यासाठी रिटर्निंग ऑफिसरच्या मुख्यालयाला,  सहसा जिल्ह्याचे मुख्यालयाला प्राधान्य दिलं जातं. मतमोजणी थेट आरओच्या देखरेखीखाली होते आणि मतमोजणीसाठी एकाच मोठ्या हॉलची निवड केली जात. यासाठी अनेक  टेबल लावली जतात.


मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम आणले जातात
मतदानानंतर ईव्हीएम मशीन जिल्हा मुख्यालयांच्या किंवा आरओ मुख्यालयाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात. स्ट्राँग रुमबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते. मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षे व्यवस्थेत बाहेर काढल्या जातात. पारदर्शकता राखण्यासाठी ईव्हीएम मशीन उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडली जातात. यानंतर, रिटर्निंग ऑफिसरने नियुक्त केलेले मतमोजणी कर्मचारी मतांची मोजणी करतात.


मोजणी एजंट आणि कर्मचारी यांच्यात समन्वय
निष्पक्षता राखखण्यासाठी मतमोजणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिशय काटेकोरपणे केली जाते. मतमोजणीच्या वेळी सर्व पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष आपापल्या मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधींसह मतमोजणी सभागृहात उपस्थित असतात. मतमोजणीसाठी लावण्यात आलेले टेबल आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्यामध्ये ठराविक अंतर ठेवलं जातं. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होते, सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाते.  पोस्टल बॅलेटच्या मोजणीनंतर अर्ध्या तासाने इव्हीएममध्ये बंद झालेल्या मतांची मोजणी सुरु होते. 


किती मोठी असते मतमोजणीची एक फेरी?
मतमोजणी दरम्यान 14 ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांची मोजणी पूर्ण होते, तेव्हा एक फेरी पूर्ण मानली जाते आणि प्रत्येक फेरीचा निकाल एकाच वेळी घोषित केला जातो. मतमोजणी पूर्ण झाल्यावर, रिटर्निंग ऑफिसर किंवा आरओ लोकप्रतिनिधी कायदा-1951 च्या कलम 66 मधील तरतुदींनुसार निकाल जाहीर करतात. यानंतर, विजयी उमेदवाराला आरओकडून विजयाचे प्रमाणपत्र दिलं जातं.


झी 24 तासवर सर्वात वेगवान निकाल
देशातील 543 जागांचे निकाल तुम्हाला झी 24 तासवर सर्वात आधी पाहाता येणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


Website
zeenews.india.com/marathi


WhatsApp Channel
whatsapp.com/channel/0029Va9GzM0EgGfIA0ris02D


Live TV
zeenews.india.com/marathi/live


Instagram
instagram.com/Zee24Taas


Facebook
facebook.com/Zee24Taas


X (Twitter)
twitter.com/zee24taasnews


Youtube Live
youtube.com/watch?v=xhQqoiwKjt0