उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. काजल निषाद यांना लखनऊसाठी रेफर करण्यात आलं आहे. त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून काजल निषाद प्रचारात व्यग्र आहेत. निवडणुकीचा प्रचार करत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजल निषादचे पती संजय निषाद यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, सध्या भीषण गर्मी असून उन्हाचा पारा चढत असल्याने प्रचारादरम्यान त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी डिहायड्रेशन आणि उच्च रक्तदाबामुळे भोवळ आल्याची शंका व्यक्त केली होती. डॉक्टरांच्या टीमने सध्या त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 


दरम्यान काजल निषाद यांना भोवळ आल्याचं समजताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी भेटण्यासाठी गर्दी केली. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही भेटीसाठी रांग लावली आहे. यादरम्यान संजय निषाद त्यांना पत्नीच्या प्रकृतीची माहिती देत आहेत. पण प्रकृती खराब असल्याने आणि औषधांमुळे काजल यांना बेड रेस्ट सांगितली असून, आराम करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितलं आहे. 


काजल निषाद 2012 मध्ये गोरखपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढल्या होत्या. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काजल यांनी 2017 मध्ये पुन्हा एकदा गोरखपूरच्या कँपियरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. पण यावेळी त्यांना विजयाची चव चाखता आली नव्हती. समाजवादी पक्षाच्या तिकीटवर त्यांनी गोरखपूर येथून पालिका निवडणूकही लढली होती. पण भाजपाचे उमेदवार मंगलेश श्रीवास्तव यांनी त्यांचा पराभव केला होता.